Snake Was Hidden In Air Conditioner : जंगलातील सिंह, वाघ, बिबट्याची सगळ्यांच भीती वाटते. त्यात विषारी आणि जमिनीवर सरपटणारा साप पाहून तर पैलवानालाही घाम फुटतो. साप हा अगदी कुठेही आढळतो, रस्त्यातून जाताना, शेतात, नाल्यांमध्ये अगदी घरातही दिसून येतो. सोशल मीडियावर आपण कमोडमधून साप बाहेर आल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे, तो पाहून तुमची हवागुल होईल. (snake came out from ac catching live rat watch video now viral Trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा ठिकाणाहून सापाने दर्शन दिलं आहे. हा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ एकदा पाहाच. 


भयानक व्हिडीओ 


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गारेगार एसीमधून एक विषारी साप लपून बसला होता. कदाचित त्यालाही गरम होत असेल म्हणून तो एसीमध्ये लपला असेल. हा झाला गंमतीचा भाग. त्या सापाला एसीमधून खाली जमिनीवर एक उंदर पळताना दिसला. उंदराला खाण्याचा तो ठरवतो. अशात तो एसीमधून सरळ खाली येतो आणि उंदरावर हल्ला करतो. 


क्षणाचाही विलंब न करता तो उंदराला तोंडात पडकून पुन्हा एसीमध्ये परत जातो. ही भयानक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


हेसुद्धा वाचा - VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय


या रुममध्ये असलेल्या एका व्यक्तीने हा धक्कादायक व्हिडीओ बनवला. सापाने उंदराला तोंडात धरुन एसीमध्ये परत जातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर theanimal.empire या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.