Snake On Wall Viral Video: स्मार्टफोन हाती येण्यापूर्वी अनेकांकडे साधे फोन होते. त्या नोकिया मोबाईलची मोठी मागणी होती. या फोनमधील स्नेक गेम (Snake Game) खूपच लोकप्रिय होता. हा गेम खेळताना सापाचा लांबी वाढण्यासोबत स्वत:ला वाचवणं आवश्यक होतं. आता स्मार्टफोनच्या जगात हा गेमची लोकप्रियता कमी झाली आहे. असं असताना एक व्हिडीओ पाहून तुम्हाला स्नेक गेमची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. आतापर्यंत तुम्ही जमिनीवर सरपटणारा साप पाहिला असेल. अमेरिकेतील एरिजोनामध्ये एका भितींवर साप स्नेक गेममधील शैलीत चढताना दिसत आहे. हा व्हिडीओ एरिझोनामधील कोरोनाडो नॅशनल मेमोरियलमधील नॅशनल पार्क सर्व्हिस कर्मचाऱ्यांनी शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओत एक विषारी साप विटांच्या भिंतीवर चढताना दिसत आहे. लाल विटांच्या गॅपमधून हा साप रेंगाळताना दिसतो. काही ठिकाणी साप मध्येच सरकतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.



आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "मी माझ्या नोकिया हँडसेटवर हा गेम खेळायची. पण त्या गेममधलं ग्राफिक्स व्हिडीओ इतकं चांगलं नव्हतं."