Viral Vidoe : सोशल मीडिया हे व्हिडीओंचा खजिनाने भरलेला आहे. इथे असंख्य व्हिडीओ क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण, काही मनोरंजक तर काही धोकादायक असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्राण्याचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ खूप छान असतात. पण प्राण्यांचे खास करुन सापाचे व्हिडीओ अतिशय भीतीदायक वाटतात. असाच एक श्वास रोखून धरणारा महाकाय अजगराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


ट्रॅफिकला लागलेला ब्रेक, सेल्फी अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील Nature is Amazing या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहून शकता दिवसाढवळा महामार्गावर वाहन्यांची ये जा सुरु आहे. काही लोक सायकलनेही प्रवास करत आहेत. अशात अचानक एक महाकाय अजगर दुर्मिळ असा हिरवा ॲनाकोंडा महामार्गावर येतो अन् क्षणात ट्रॅफिकला ब्रेक लागतो. हे पाहून लोक आश्चर्यचिकत होतात. हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरतात. त्यातील एक व्यक्ती तर सापासोबत सेल्फी काढतानाही दिसत आहे. 


या महाकाय अजगर महामार्गाच्या  दुभाजकावर रेंगाळताना दिसते. त्यानंतर तो रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या गवतांमध्ये शिरतो. क्रॉसिंग दरम्यान, साप कोणालाही इजा न करता सुरक्षितपणे जाऊ शकेल याची खात्री करून देण्यात आली. 



हा व्हिडीओ शेअर करताना तो ब्राझीलमधील असल्याचा सांगण्यात आलाय. ट्विटरवर शेअर केलेले हे फुटेज 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर त्याला 59 हजार लाइक्स मिळाले असून असंख्य लोक व्हिडीओवर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'हा एक मोठा सुंदर साप आहे.' दुसऱ्याने म्हटलंय की, 'व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद.' तर तिसऱ्याने आपली भीती व्यक्त केली, 'हे खूप भीतीदायक आहे.'