एअर इंडिया ग्रुपच्या एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या विमानात साप आढळल्याची घटना घडली आहे.या घटनेने फ्लाईटमध्ये असलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी विमानतळ अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी सापाला विमानातून बाहेर काढले होते. दरम्यान या घटनेनंतर डीजीसीएने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


घटना काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express)  B737-800 बोईंगचे विमान केरळमधील कालिकत येथून दुबईसाठी निघाले होते. शनिवारी दुबईत उतरल्यानंतर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप (snake) आढळून आला होता. मात्र, या प्रकरणात प्रवाशांना कोणतीही जीवीतहानी झाली नसून त्यांना दुबई विमानतळावर (Dubai Airport) सुखरूप उतरवण्यात आले होते. घटनेच्या वेळी विमानात किती प्रवासी होते, याची माहिती देखील मिळू शकली नाही.


अधिकाऱ्यांचे म्हणणे काय? 


DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुबई विमानतळावर (Dubai Airport) विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळला होता. या घटनेची माहिती विमानतळ अग्निशमन सेवेला देण्यात आली होती. त्यानंतर या सापाला बाहेर काढण्यात आले होते. 


चौकशीचे आदेश 


दरम्यान ग्राउंड हाताळणीत निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी करून कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल.


तसेच या घटनेबाबत एअर इंडिया एक्सप्रेसकडून (Air India Express) कोणतेही वक्तव्य अद्याप तरी केलेले नाही आहे.