जगातील असं बेट, जिथं आहे विषारी सापांचं राज्य, माणसांना तेथे जाण्यापासून पूर्ण बंदी
खरंतर ब्राझीलमध्ये एक असं बेट आहे, जेथे फक्त सापच राहातात. या बेटाचं नाव इल्हा दा क्विमाडा ग्रांडे आहे.
बिहार : साप हा खूप खतरनाक प्राणी आहे. त्याला समोर पाहिलं तरी लोकं थरथर कापायला लागतात. खरंतर सगळेच साप हे विषारी नसतात, परंतु जर एखाद्या विषारी सापाने चावलं, तर मात्र माणसाची वाचण्याची शक्यता फारच कमी असते. कारण त्यावरची औषध सगळ्यात रुग्णालयात मिळत नाही आणि साप चावल्यावर वेळेत उपचार मिळाला नाही तरी देखील व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मग अशातच जर तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगितले जिथे फक्त आणि फक्त विषारी साप राहतात तर?
खरंतर ब्राझीलमध्ये एक असं बेट आहे, जेथे फक्त सापच राहातात. या बेटाचं नाव इल्हा दा क्विमाडा ग्रांडे आहे. जे विषारी सापांचे बेट आहे आणि येथे कोणत्याही माणसाला जाण्याची परवानगी नाही.
सो पाउलोपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या इल्हा डी क्विमाडा ग्रांदे बेटावर हजारो प्रकारचे साप आढळतात, जे अत्यंत विषारी आहेत. असे म्हणतात की या बेटावर काही धोकादायक साप आहेत, जे हवेत उडी मारतात आणि पक्ष्यांना चावतात. त्यामुळे विचार करा की अशा स्थितीत एखाद्या माणसाचं काय होईल..
येथे उपस्थित असलेला दुर्मिळ आणि सर्वात विषारी साप म्हणजे सोनेरी डोके असलेला गोल्डन लान्सहेड वाइपर, जो फक्त याच बेटावर आढळतो. त्याचं विष इतकं घातक असल्याचं म्हटलं जातं की, तो मानवी मांसाला वितळवून टाकतो.
त्यामुळे या धोकादायक ठिकाणी पर्यटक किंवा सामान्य माणसाला जाण्यास परवानगी नाही. ब्राझिलियन नेव्ही आणि चिको मेंडेस इन्स्टिट्यूट फॉर जैवविविधता संवर्धनातील निवडक संशोधकच या ठिकाणी भेट देऊ शकतात.
1909 ते 1920 या काळात लाईट हाऊसच्या ऑपरेशनसाठी काही लोक तिथे राहत होते, पण आता सापांच्या भीतीने कोणीही तिकडे जात नाही, असे सांगितले जाते. शिकारी बेकायदेशीरपणे या बेटावर येत असल्याच्या काही अफवा पसरल्या असल्या तरी यातील सत्यतेची पुष्टी झालेली नाही.