Trending News :जगाच्या कानाकोपऱ्यात निसर्ग कायम आपल्या अनेक चमत्कार दाखवत असतो. जेव्हा आपण ऑफिसमधून निघून निसर्गात जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला निसर्गाचे असंख्य आविष्कार दिसतात. हे आविष्कार पाहून आपण भारावून जातो. काही जागा, काही निसर्गाचे खेळ पाहून ते आपण अवाक् होतो. आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, असा समोरच दृश्यं असतं. निसर्गाचा हा आविष्कार पाहून आपण पृथ्वीतलावर आहोत यावरच विश्वास बसत नाही. एखाद्या चित्रपटातील दृश्यांनाही लाजवेल असा चमत्कार या निसर्गात पाहिला मिळतो. असाच एक मनमोहन टाकणार दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये बर्फ, वाळू आणि समुद्र यांचा मिलाफ पाहिला मिळतोय. डोळ्याच पारण फेडणार हे दृश्यं नेमकं कुठे आहे जाणून घेऊयात. (Snow sand and sea A wonderful miracle of nature can be seen at this place trending news)


अविस्मरणीय, अद्भूत आणि अविश्वसनीय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या जगाने अनेकांना वेड लावलं आहे. इथे आपल्याला असंख्य व्हिडीओ आणि फोटोच पाहिला मिळतात. स्टाग्राम असो किंवा फेसबुक-ट्विटर यावर लाखो गोष्टींचा खजिना आहे ज्याबद्दल आपल्याला कल्पनाही नसते. निसर्गाचे असंख्य व्हिडीओ ज्याची आपण आकड्यांमध्ये मोजणीही करु शकत नाही. हे व्हिडीओ आपल्याला सुखद धक्का देतात. जगाच्या पाठीवर असेही चमत्कार घडतात जे पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. त्या चमत्काराचा आपण प्रत्यक्षात कधी अनुभव घेऊ याची आतुरतेने तुम्हीच वाट पाहाल. 


बर्फ, वाळू आणि समुद्र यांच्या मिलनाचा अविस्मरणीय, अद्भूत आणि अविश्वसनीय फोटो जपानी फोटोग्राफरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे जपानमधील पश्चिम किनाऱ्यावर एक अप्रतिम छायाचित्र आहे. जे पाहून नेटकऱ्यांना जगाचा विसर पडत आहे. 


तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता एका बाजूला बर्फाची पांढरी शुभ्र चादर, तर दुसऱ्या बाजूला मोठा निळा महासागर आणि या दोघांच्यामध्ये वाळूचं साम्राज्य...या अद्भूत आविष्काराचा अनुभव घेत असताना वाळूवरुन चालताना एक माणूस...हा अप्रतिम फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 



'वेल्थ' या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला असून त्यावर लिहिलं आहे की, 'जपानचा होक्काइडो बीच जगातील सर्वात अनोख्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे समुद्र, वाळू आणि बर्फाचा संगम पाहिला मिळतो.' या फोटोला लाखोच्या घरात व्हयूज मिळाले आहेत. तर या पोस्टला आतापर्यंत 658,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.