मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर हा फोटो पाहून तुम्हाला देखील असं वाटेल की, ढग फुटी झाली आहे, किंवा आकाशातुन त्सुनामी येत आहे. हो हा फोटो हृदयाचा ठोका चुकावणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील एका महिलेने हे धक्कादायक दृश्य पाहिले. जेव्हा तिने मोठमोठे ढग एकत्र पाहिले तेव्हा तिच्या संवेदना उडाल्या, कारण आकाश महासागरासारखे दिसत होते.


KVRR शी बोलताना, थेरेसा बिर्गिन लुकास म्हणाली की ती रॉचेस्टरमध्ये एका दीर्घ शनिवार आणि रविवारनंतर, जेव्हा ती मिनेसोटा शहराकडे जात होती. तेव्हा तिने हे दृश्य पाहिले, ज्याने तिच्या संवेदना उडाल्या. कारण तुम्ही जर नीट पाहिलंत तर आकाशातून समुद्राच्या लाटा वाहत असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी तिने रस्त्याचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.



हा फोटो शेअर करताना तिने आपल्या भावना देखील शेअर केल्या, त्यावेळी आकाशातील या भयानक दृश्याबद्दल देखील तिने म्हटलं आहे.


एका यूजरने लिहिले, 'तुम्ही इतके अविश्वसनीय फोटो काढले का? ते आश्चर्यकारक आणि छान दिसत आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'रस्ता थेट समुद्राकडे जात असल्याचे दिसते. हे खरोखर छान चित्र आहे!'