मुंबई :  जगावर एकामागून एक नवनवीन संकट येत आहे. कोरोनानंतर त्याचे विविध व्हेरीअंट आले आहेत. त्यामुळे मानवसृष्टी आधीच अडचणीत आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची तीव्र शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार, सूर्याकडून येणारे एक मोठे वादळ पृथ्वीच्या वातावरणाशी टक्कर घेऊ शकते. त्यानुसार, येत्या काही दिवसात एक महाकाय वादळ पृथ्वीवर येऊन धडकणार आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत काय काय घडू शकतं, हे आपण जाणून घेऊयात. (solar storm hitting on earth at speed of 16 lakh kmph) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याच्या परिमंडळात तयार झालेलं एक महाकाय सौर वादळ पृथ्वीच्या दिशेनं झेपावतंय. पुढच्या दिवसात तब्बल 16 लाख किलोमीटर वेगानं ते पृथ्वीवर धडकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढच्या  दिवसांत निसर्गामध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



नक्की काय परिणाम होणार?


या वादळाचा परिणाम हा विविध घटकांवर होऊ शकतो. त्यानुसार, विमानाची यंत्रणा,रेडिओ सिग्नल, कम्युनिकेशनची माध्यमं, फोन नेटवर्क कृत्रिम उपग्रह आणि पाऊस या घटकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. सूर्यापासून तयार झालेलं हे वादळ अत्यंत उष्ण आहे. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढण्याचीही शक्यता आहे.


या सौर वादळादरम्यान पृथ्वीजवळचे ग्रह अधिक प्रकाशमान दिसणार आहेत. पुढच्या दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसतील आणि त्यांच्याभोवती वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसू शकेल, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. उत्तर आणि दक्षिण धृवांजवळ राहणा-यांना आकाशात 'सेलेस्टिअल लाईट्स'ची रोषणाईदेखील बघायला मिळू शकेल. त्यामुळे पुढचे  काही दिवस पृथ्वीवरच्या बदलांना सामोरे जायला तयार राहा.