टोकियो : जपानच्या सोनी कॉर्पोरेशन कंपनीनं एक नवा रोबो लॉन्च केला... पण हा यंत्रमानव नाही तर तो आहे यांत्रिक कुत्रा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आईबो' नावाचा हा कुत्रा १८० मिलीमीटर लांब, २९३ मिलीमीटर उंच आहे. यापूर्वी याच नावाचा यांत्रिक कुत्रा सोनीनं बनवला होता. २००५ साली तो बाद झाल्यानंतर त्याचीच ही नवी आवृत्ती सोनीनं जगासमोर आणलीय.


'ऑर्गेनिक लाईट एमिटिंग डायोड'पासून बनलेले डोळे असलेला आईबो २२ मोटर्सवर चालतो. विशेष म्हणजे याच्या मालकांना त्याची यंत्रणा स्मार्टफोनसोबत जोडता येते. 


कुत्रा हा माणसाचा सर्वात इमानदार मित्र... आता त्यात आपल्या आदेशांवर चालणारा आईबोसारखा मित्र असेल, तर दुधात साखरच... 


आजघडीला या यांत्रिक कुत्र्याची किंमत 1738 अमेरिकन डॉलर्सच्या घरात आहे. 11 जानेवारीपासून याची शिपमेंट सुरू करण्यात येईल, असं कंपनीनं जाहीर केलंय.