315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये
first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न
first interstellar object to enter our solar system: आकाशगंगेत अगणित तारे आहेत असं शालेय अभ्यासक्रमात अनेकदा शिकायला, वाचायला मिळालं. पुढे जाऊन अनेकदा अनेकांसमोर या न त्या संकल्पनांमुळे ही आकाशगंगा विविध रुपांनी समोर आली. आपण, ज्या आकाशगंगेत राहता अशा आणखीही काही अकाशगंगा अस्तित्वात असल्याचा पुरावा अनेक निरीक्षणपर अहवाल आणि संदर्भांच्या माध्यमातून मिळाली. अशा या दूरवरच्या कोणा एका आकाशगंगेतून म्हणजे एक अनोळखी दगजवजा लंबवर्तुळाकार वस्तू आता थेट पृथ्वीच्या आकाशगंगेच्या दिशेनं झेपावत आहे.
2017 मध्ये Pan Starrs1 या हवाईच्या दुर्बिणीनं पहिल्यांदाच ही अनोळखी वस्तू टीपत ओमुआमुआ असं तिचं नाव असल्याचं जाहीर केलं. ही वस्तू प्रचंड वेगानं आपल्या आकाशगंगेच्या दिशेनं येत असून, दुसऱ्या आकाशगंगेपासून प्रवास करत पृथ्वी आणि इतर ग्रह असणाऱ्या आकाशगंगेत येणारी ही पहिलीच गोष्ट आहे.
हवाईयन भाषेमध्ये Oumuamua चा अर्थ आहे संदेशवाहक. अवकाशातील प्रवास करणारी ही एक वस्तू बहुधा दुसऱ्या आकाशगंगेतील संदेशवाहक असू शकते या कारणानं तिला हे नाव देण्यात आलं आहे. या अज्ञात वस्तूचा आकार साधारण लंबवर्तुळासम असून, 10:1 इतकं त्याचं गुणोत्तर असू शकतं असा अंदाज बांधला जात आहे. ही वस्तू एखाद्या लघुग्रह किंवा धूमकेतून 10 पट मोठी असल्याचंही सांगण्यात येत आहे. सूर्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या वस्तूचा वेग आहे 315000 किमी प्रतितास.
हेसुद्धा वाचा : भारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश
खडक आणि धातूपासून ही अज्ञात वस्तू तयार होऊ शकते असं अभ्यासकांचं मत आहे. जानेवारी 2018 नंतर ओमुआमुआ नेमकं कुठे आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, आपल्या आकाशगंगेच्या दिशेनं सुरु असणारा त्याचा प्रवास पाहता अभ्यासकांसाठी ही एक कुतूहलाची आणि तितकीच आव्हानात्मक बाबही ठरत आहे. बरं, ही वस्तू नेमकी पृथ्वीपर्यंत कधी येईल, पृथ्वीच्या नजीक येईल की नाही, आपल्या आकाशगंगेतून तिचा प्रवास कसा असेल याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळं तज्ज्ञ मंडळी या ओमुआमुआचा पुन्हा नव्यानं शोध घेण्यासाठी आता कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहेत.