Can astronaut pregnant in space: जागतिक स्तरावर सध्या बरेच मुद्दे चर्चेता विषय ठरत आहेत. त्यातच अमेरिकेच्या माध्यमांकडून समोर आलेल्या महितीनुसार एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. हा मुद्दा म्हणजे, महिलांच्या गर्भधारणेचा. सध्या स्पेस एजेंसी नासा (NASA) समोर कोणत्याही नव्या संशोधनापेक्षा त्यांच्या अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित चिंता सतावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द डेली बीस्ट'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांना नको असणाऱ्या गर्भाचा सामना करावा लागू शकतो यामुळंच नासा चिंतेत आहे. कारण, येत्या काळात ते एका मोहिमेवर अपेक्षेहून जास्त वेळ व्यतीत करणार आहेत. 


का होतेय इतकी चर्चा? 
अवकाळातील शरीरसंबंधांविषयी वक्तव्य करणं नासाला पसंत नाही. किंबहुना अनेक खगोलशास्त्रज्ञ या मुद्द्यावर बोलण्यास संकोचलेपणा व्यक्त करतात. पण, 'स्पेस सेक्सोलॉजी'कडे दुर्लक्ष करता येत नाही. मनुष्य प्रजातीच्या भविष्याविषयी विचार करताना हा मुद्दा गांभीर्यानं समजून घेण्याची आवश्यकता आहे की, अंतराळात संबंध ठेवणं नेमकं कसं शक्य असेल असं, एका अहवालात म्हटलं गेलं आहे. 


पाहा : Trending : मासा आणि मगरीचं घनघोर युद्ध... पण निकाल लागला अनपेक्षित.. पाहा व्हिडीओ


 


तज्ज्ञांच्या माहितीनुसार आतापर्यंत कधीच अंतराळात शरीरसंबंध झाल्याची घटना घडलेली नाही. पण, आता ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला गरोदर माता आणि तिच्या (Pregnancy) गर्भात वाढणाऱ्या बाळावर अवकाशाचा काय परिणाम होईल यावर अभ्यास केला जात आहे.