तस्मानिया: अनेकवेळा तुम्हा स्पॅम किंवा अनोळखी नंबरवरून सतत फोन येत असतील तर तुम्ही ते ब्लॉक करता. काही वेळा रागाने उचलता किंवा तसेच राहू देता. पण एका अनोळखी नंबरवरून सतत येणाऱ्या कॉलला महिलेनं संतापाने उचललं आणि चमत्कार झाला. तिचं नशीबच पालटलं. एखादी नोकरी किंवा प्रॉपर्टी नाही तर तिला चक्क कोट्यवधींची लॉटरी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीआय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेला स्कॅमर्स कॉल उचलणं पसंत नव्हतं. त्यामुळे ती सारखी टाळत होती. मात्र सतत येणाऱ्या फोनला वैतागून रागाच्या भरात तिने फोन उचलला आणि तिला सामजलं की आपल्याला 1.5 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 11 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. ही किंमत ऐकूनच महिलेला मोठा धक्का बसला. 


ही घटना ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया इथल्या लाउंसेस्टन इथे राहणाऱ्या महिलेसोबत घडली आहे.  'द लॉट'च्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार ती अनोळखी नंबर उचलत नव्हती. फ्रॉड असेल याची तिला भीती होती. अखेर वैतागून तिने फोन उचलला आणि तिला लॉटरी लागल्याचं कळताच धक्का बसला. 'मला वाटलं तो फोन फेक असेल आणि कोणीतरी मस्करी करत असेल.' 


'मी रागाने फोन उचलला. त्या व्यक्तीला मी खूप ऐकवणार होते माझा संताप अनावर झाला होता. मात्र समोरून ऐकलेल्या गोष्टीनं मलाच मोठा धक्का बसला', असं महिला म्हणाली 31 जुलै रोजी या महिलेला 1.5 मिलियन डॉलर्सची लॉटरी लागली होती. वेस्टबरी फेस्टिवल लोट्टो आऊटलेटमधून तिने याचं तिकीट खरेदी केलं होतं. त्याचा निकाल आला आणि या महिलेला कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागल्याचं कळलं.