मुंबई: माणूस कठीण परिस्थितीतही तग धरू शकतो, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अशीच परिस्थती अमेरिकेतील नेल्सन नेडी (Nelson Neddy) या व्यक्तीवर ओढावली होती. एका अनोखी बेटावर अडकल्यानंतर चक्क 5 दिवस लिंबू आणि कोळसा खाऊन नेल्सन नेडीने जिवंत राहून दाखवलं आहे. नेल्सन नेडी अज्ञात बेटावर कसे पोहचले, त्यांच्यावर लिंबू आणि कोळसा खाण्याची वेळ का? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्ञात बेटावर नेल्सन नेडी कसे पोहचले 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलचा रहिवासी असलेला 51 वर्षीय नेल्सन नेडी हा रिओ डी जनेरियोमधील ग्रुमारी दगडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी समुद्राच्या जोरदार लाटा आल्या आणि नेडी पाण्यात वाहून गेले. नेल्सन यांना पाण्यात पोहता येत होतं म्हणून त्यांनी सुमारे 3 किमी समुद्रात पोहत पुढचा टप्पा गाठला. पोहता पोहता नेडी यांनी निर्जन पालमास बेट गाठले. तिथे त्यांना परतीसाठी वाहतूकीचे दुसरे साधन उपलब्ध झाले नाही म्हणून त्यांना 5 दिवस त्याच बेटावर  थांबाव लागले.  


लिंबू आणि कोळसा खावं लागले 


निर्जन पालमास बेटावरून पोहण्याता प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात अपयशस्वी ठरले. बेटावर खाण्यासाठी काहीच सुविधा नसल्याने नेल्सन नेडी लिंबू, कोळसा खावं लागले. नेल्सन यांनी ब्राझिलियन मीडियाशी बोलताना सांगितले. तिथे काहीच नव्हते. राहण्याची व्यवस्था नव्हती. मग मला एक गुहा सापडली आणि त्या आजुबाजूच्या परिसरात मला कोळसा आणि लिंबू निर्देशनात आले. पुढे त्यांनी सांगितले की, एक तंबू सापडला, जो स्थानिक मच्छिमाराचा असावा. जमिनीवर दोन लिंबू सापडले. मी दोन्ही लिंबू खाल्ले. त्यांनी माकडांना कोळसा खाताना पाहिले होते. कोळसा खाऊन नेल्सननेही पोट भरले. जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी समुद्राचे पाणी प्यायले. पाच दिवस उलटून गेल्यानंतर नेल्सनला एक मोटरबोट आईसलँडच्या दिशेने येताना दिसली. ज्यामध्ये काही लोक जहाजावर आले होते.  हे पाहिल्यानंतर त्यांनी आपला टी-शर्ट हवेत फिरवू लागले. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे नेल्सनचा जीव वाचवण्यात यश आले.