जगात पहिल्यांदा घडलं असं, दुर्मिळ जिराफाचा फोटो पाहून तज्ज्ञही अवाक्
Viral News In Marathi: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सोनेरी रंगाचा एक जिराफ यात दिसत आहे. जिराफ हा लांब मान, शरीरावर पट्टे यासाठी ओळखला जातो. मात्र या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत.
Trending News In Marathi: प्रत्येक प्राणी हा त्यांच्या शरीराच्या रचनेनुसार किंवा त्याच्या स्वभावानुसार ओळखला जातो. जसं, वाघ, सिंह आणि चिता हे मार्जार कुळातील प्राणी आहेत. मात्र तरीही त्यांच्या शरीर रचना एकमेकांपासून फार वेगळी आहे. त्यांच्या शरीरावरील पट्टे ते सिंहाची आयाळ हे सगळं वेगळं आहे. त्याचप्रमाणे जिराफ आणि झेब्रा यांच्या शरीरावरील पट्टेदेखील वेगळे आहेत. जिराफाच्या शरीरावरील चट्ट्यांची वेगळी ओळख आहे. मात्र, अमेरिकेत एक अनोखा प्रकार घडला आहे. अमेरिकेत एका अनोख्या पद्धतीचा जिराफ जन्माला आला आहे. या जिराफाच्या शरीरावरील पट्टेच गायब आहेत. अमेरिकेतील टेनेसी येथे हा अनोखा जिराफ जन्माला आला आहे. यानंतर सोशल मीडियावर याचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. तर, या बेबी जिराफला पाहायला लोकांची झुंबड उडाली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या बेबी जिराफची आई ही सामान्य असून तिच्या शरीरावरही इतर जिराफांनुसार पट्टे आहेत. तर, जगात पहिल्यांदाच अशाप्रकारचा जिराफ जन्माला आला आहे. या जिराफचा फोटोही समोर आला आहे. या पट्टे नसलेल्या दुर्मिळ जिराफाची लांबी सुमारे 6 फूट आहे. या जिराफच्या बाळाला अद्याप नाव देण्यात आलेलं नाही.
31 जुलै रोजी या बाळाचा जन्म आहे. तर या बाळाच्या संपूर्ण शरीराचा रंग सोनेरी रंगाचा आहे. या बाळाच्या नामकरणासाठी अभयारण्याने सोशल मीडियावर एक स्पर्धा आयोजित केली आहे. सध्या तरी अभयारण्याकडूनच या जिराफाची काळजी घेतली जात आहे. तर, या अनोख्या जिराफाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. तर, हे बेबी जिराफ असे अनोखे कसे जन्मले याचे संशोधनही केले जात आहे.
दरम्यान, असे अनोखे जिराफ जन्मल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. याआधीही 2016मध्ये तरंगिरे नॅशनल पार्कच्या जंगलात पांढऱ्या रंगाच्या जिराफाचे कुटुंब होते. यात एक मादी जिराफ आणि दोन लहान जिराफ होते. त्यानंतर गरिसा काउंटीमध्येदेखील त्यांना फिरताना पाहिलं गेलं आहे. मात्र 2020मध्ये शिकाऱ्यांनी मादी जिराफ आणि बेबी जिराफची शिकार केली होती. पण सुदैवाने एक बेबी जिराफ वाचले होते.