कोलंबो : श्रीलंकेत सध्या तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर दोन गटात तणावात भर पडली आहे. खबदारीचा उपाय म्हणून येथे समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरुन कोणतीही अफवा पसरु नये आणि त्याचे दुष्परिमान वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. दोन समाजांमध्ये वाढलेल्या तणावामुळे श्रीलंकेत समाज माध्यम बंद ठेवण्यात आली आहेत. श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर अल्पसंख्याक मुस्लीम आणि बहुसंख्य सिंहलींमध्ये तणाव वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर एका मुस्लीम दुकानदाराने टाकलेल्या पोस्टनंतर श्रीलंकेच्या चिलॉ़ भागात काही लोकांनी एक मशीद आणि मुस्लीम मालक असलेल्या दुकानांवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही समाजामधील वाद वाढत गेला. यामुळे त्याभागात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून फेसबूक आणि वॉट्सअप बंद ठेवण्यात आले आहेत. 



काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत नऊ आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. न्यूझीलंडमधील मशीदीवरी हल्ल्याचा बदला म्हणून काही मुस्लीम दहशतवाद्यांनी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये २५८ निष्पाप नागरिकांना आपेल प्राण गमवावे लागले होते.