Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील तणावपूर्ण वातावरणामुळे श्रीलंका सरकारकडून (Srilankan Government) आणीबाणी (Emergency) लागू करण्यात आली होती. मात्र सरकारने शनिवारी आणीबाणी हटवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची अर्थव्यवस्था बिकट असल्यामुळे काही आंदोलकार्त्यांनी मिळून माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षेसह (Mahinda Rajpakshe) काही नेत्यांच्या घराला आग लावल्याची घटना घडली होती. यामध्ये एका नेत्याला जीवही गमवावा लागला होता. सगळ्या घटनांनंतर राजपक्षेंनी राजीनामा दिला आणि नवीन सरकार स्थापन करण्यात आले. (Srilankan Government lifts up Emergency After two weeks)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच महिन्यात दोन वेळा आणीबाणी - 


अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे श्रीलंकेचे नागरिक आक्रमक झाले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने काढत आंदोलन केली. आक्रमक आंदोलनामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मध्यरात्री आणीबाणी लागू करण्यात आली. 


का हटवली श्रीलंकेत आणीबाणी? - 


श्रीलंकेच्या स्थानिक न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती सचिवायलने शुक्रवारी मध्यरात्रीच आणीबाणी हटवली आहे. आणीबाणी लागू करणे किंवा कायम ठेवण्याचा निर्णय हा पूर्णपणे संसदेवर अवलंबून असतो. मात्र सरकारने संसदेत आणीबाणीचा नियम लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


श्रीलंकेवर आर्थिक संकट - 


श्रीलंकेवर पुन्हा आर्थिक संकट ओढावलं आहे. विदेशी चलन कमी असल्याच्या कारणाने हे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. आर्थिक संकट बिकट असल्यामुळे नागरिकांही आक्रमक झाले आहेत. ज्यामुळे राजपक्षेंना राजीनामा देत सत्ता सोडावी लागली.