Airline Founder Personally Apologize Passengers: विमानप्रवासादरम्यान फ्लाइट डिले होणे, विमानतळावर वाट पहावी लागणे यासारख्या गोष्टी काही नवीन नाहीत. रोज शेकडोच्या संख्येनं प्लाइट्स रिशेड्यूल होतात. प्रवाशांना मात्र या साऱ्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. बरं यासंदर्भात एअरलाइन्सकडे (Airline) तक्रार केली तर केवळ फॉरमॅलिटी म्हणून उत्तर मिळतं मात्र कारवाई कोणावरही होत नाही. त्यामुळे विमानप्रवासादरम्यानचे हाल हा अगदीच प्रवाशांनी आणि विमान कंपन्यानी अनधिकृतपणे स्वीकारलेला प्रकार झाला आहे. असं असतानाच तैवानमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. या बातमीची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे. झालं असं की विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्याने विमान कंपनीचे मालक स्वत: प्रवाशांची माफी मागण्यासाठी विमानतळावर पोहोचले. इतकच नाही तर ही व्यक्ती सर्व प्रवाशांच्या समस्यांचे निराकारण होत नाही तोपर्यंत म्हणजेच संपूर्ण रात्र विमानतळावर घालवली.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भातील वृत्त तैवान न्यूजने दिलं आहे. या वृत्तानुसार स्टारलक्स एअरलाइन्सचं एक विमान दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेणं अपेक्षित होतं. मात्र त्याचवेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने विमानाचे उड्डाण पुढे ढकलण्यात आलं. मात्र नंतर या विमानाने उड्डाणच घेतलं नाही आणि सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने नेण्यात येईल असं सांगितलं गेलं. मात्र वादळामुळे हे विमानही उड्डाण करु शकलं नाही. सर्वच प्रवासी रात्री 11 वाजेपर्यंत त्या विमानामध्येच बसून होते. त्यांना योग्य माहिती दिली जात नव्हती. यामुळेच प्रवाशांनी विमान कंपनीच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली.


खाण्यापिण्याचीही सोय नाही


याच विमानाने प्रवास करत असलेल्या स्काय चेनने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सायंकाळी 7 वाजल्यापासून प्रवासी विमानात बसून होते. मात्र विमानामध्ये साधे क्रू मेंबर्सही नव्हते. विमान 11 वाजता उड्डाण घेईल असं सांगण्यात आलं. सर्व प्रवाशांना अगदी मध्यरात्रीपर्यंत थांबवून ठेवण्यात आलं. नंतर हे विमानही उड्डाण करणार नाही असं सांगण्यात आलं. विमानतळाच्या टर्मिनसवरच रात्रभर थांबवावं लागेल अशं सांगण्यात आलं. या प्रवाशांसाठी झोपण्याची सोय करण्यासाठी स्लिपिंग बॅग देण्यात आल्यानंतर पहाटे 6 वाजता आणि नंतर सकाळी 8 वाजता विमान उड्डाण घेईल असं सांगितलं गेलं. मात्र या प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती.


मालक थेट विमानतळावर पोहोचले


आपल्या एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्यांचे एवढे हाल होत असल्याचं विमान कंपनीचे मालक चांग कुओ-वेई (Chang Kuo Wei) यांना समजल्यानंतर ते स्वत: या प्रवाशांची माफी मागण्यासाठी विमानतळावर पोहोचले. इतर विमानांच्या डागडुजीची कामं सुरु आहेत तसेच उपलब्ध पायलेट्सचे ड्युटी अवर्स पूर्ण झाल्याने विमान उड्डाणाला उशीर होत असल्याचं वेई यांनी प्रवाशांना सांगितलं. कंपनीचं सर्व काम मध्यरात्रीनंतर थांबवण्यात आल्याने प्रवाशी अडकून पडले. या प्रवाशांबरोबरच वेई हे सुद्धा विमानतळावरच थांबले. अखेर सकाळी अन्य विमानाने प्रवासी रवाना झाल्यानंतर वेई विमानतळावरुन निघाले.