शेरास सव्वाशेर! पगार वाढावा म्हणून `त्यानं` लढवली शक्कल
पाहा काय घडलंय, काय बिघडलंय....
मुंबई : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरी करणारे आणि आपली हौस, आवडीच्या क्षेत्रात काम करण्याच्या अनुभवासाठी नोकरी करणारे; असे दोन गट आपल्याला पाहायला मिळतात. एक गट हा अनुभवामुळे आनंदात असतो, तर दुसरा गट मात्र पगार कमी मिळतो म्हणून सतत रडगाणं लावून असतो.
मुळात पगारात गरजा भागत नसल्यामुळंच हे रडगाणं असतं. घरभाड्यापासून, महिन्याचा खर्च, खाण्यापिण्यासाठीची तरतुद आणि त्यातूनच वेळ मिळाला तर काहीसा स्वत:वर होणारा खर्च हे करताना अनेकांचीच भंबेरी उडते.
सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे घरभाड्याचा. मोक्याच्या शहरात भाड्याच्या घरात राहणं परवडत नाही, याचमुळे काहीजण शहरापासून दूर घर निवडताना दिसतात.
पण हे सारं न जमलेल्या एका माणसानं जे केलंय ते पाहून सारं जग त्याची करामत पाहून भारावून गेलं आहे.
आता हा त्याचा नाईलाज म्हणा किंवा आणखी काही. पण, या माणसानं एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. Simon quietly असं अमेरिकेतील या व्यक्तीचं नाव.
त्यानं घरभाडं परवडत नाही म्हणून थेट ऑफिसच्याच क्युबिकलमध्ये घर थाटलं आहे. Tik Tok व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं आपण नेमकं कसं राहतो याची झलक सर्वांसमोर आणली.
पाहा... माझं नवं घर; असंच तो इथं म्हणताना दिसत आहे. आतापर्यंत त्याचा हा व्हिडीओ 12 मिलियन नेटकऱ्यांनी पाहिला आहे. आपल्याला पगार कमी मिळत असल्यामुळं आंदोलन म्हणून मी आतापासून माझ्या नोकरीच्याच ठिकाणी राहणार आहे, असं तो इथं म्हणताना दिसतो.
'पाहू आता आम्ही हे सारं किती दूरवर नेतो...; असं तो या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. हा बॉससाठीचा इशाराही असू शकतो बरं...
व्हायरल व्हिडीओमध्ये Simon quietly त्याच्या ऑफिस क्युबिकलला घरामध्ये बदलताना दिसत आहे. एका कोपऱ्यात जेवण करताना दिसत आहे. तर, ऑफिसनं दिलेल्या खणांमध्ये कपडे ठेवताना दिसत आहे.
इथवरच न थांबता ऑफिसमध्येच तो अंघोळही करत असल्याचं सांगतना दिसत आहे.
कुतूहलाचा भाग, पण सध्या अप्रायझलचा काळ आहे. पगारवाढीची अपेक्षा सगळेच करत आहेत. पण, जर का पगारवाढ नाहीच मिळाली तर तुम्ही असं एखादं आंदोलन करण्यासाठी तयार व्हाल?