नवी दिल्ली : स्टेट बँकेने विजय मल्ल्याकडून 963 कोटी रुपये वसूल केले आहे. स्टेटने बँकेने कारवाई करत हे पैसे वसूल केले आहेत. मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती विकून बँकेने हे पैसे वसूल केले आहेत. एसबीआचे एमडी अरिजित बसू यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती विजय मल्याला मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या फरार झाला आहे.


आयडीबीआय बॅंकेने मल्ल्याच्या १ हजार ४११ कोटी रुपये किमतीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर टाच आणली आहे. बॅंकांची कर्जे बुडवून मल्ल्या मार्च महिन्यापासून लंडनला फरार झाला आहे.