पॉर्न स्टारचा दावा, ट्रम्पसोबतच्या संबंधावर मैन बाळगण्यासाठी धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या कथीत शरीरसंबंधांबाबत दावा करणाऱ्या पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने पुन्हा एकदा घणाघात केला आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या कथीत शरीरसंबंधांबाबत दावा करणाऱ्या पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने पुन्हा एकदा घणाघात केला आहे. या प्रकरणाबाबत मौन तोडत एका टीव्ही कार्यक्रमात स्टॉर्मीने म्हटले आहे की, ट्रम्प यांच्यासोबत राहिलेल्या संबंधांबाबत तोंड मोन बाळगण्यासाठी आपल्याला धमकीही देण्यात आली होती. एक अनोळखी व्यक्ती अचानक समोर आली आणि तिने ट्रम्प यांना एकटे सोड, असे सांगितल्याचे स्टर्मीने म्हटले आहे.
लॉस वेगास येथे घडले प्रकरण
सीबीएसच्या ६० मिनिस्टमध्ये बोलताना स्टॉर्मीने म्हटले की, २०११ म्हणजेच ७ वर्षांपूर्वी लॉस वेगास येथे हे प्रकरण घडले. स्टॉर्मी डॅनियल्स हिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड असे आहे. आपण आपल्या लहान मुलीसोबत फिटनेस क्लासला जात होतो तेव्हा एक व्यक्ती अचानक पुढे आला आणि त्याने मला धमकी दिली.
' ट्रम्प यांना एकटे सोड '
स्टॉर्मीने पुढे सांगितले की, 'हा व्यक्ती जेव्हा माझ्या जवळ आला तेव्हा त्याने मला ट्रम्प यांना एकटे सोड असे धमकावले. जे काही घडले ते विसरून जा. ही धमकी देणाऱ्या व्यक्तिला मी ओळखत नाही. त्याने माझ्या मुलीकडे पाहिले आणि किती गोड मुलगी आहे, असे उद्गार काढले. जर हिच्या आईला काही झाले तर, ते किती दुर्दैवी असेल असेही ती व्यक्ती असे म्हणाली. धमकी देऊन हा व्यक्ती लगेच निघून गेला असेही स्टॉर्मीने म्हटले आहे.'
तोंड बंद ठेवण्यासाठी करार
२०१६मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काही दिवस आगोदर डॅनियल्सने ट्रम्प यांच्या वकिलासोबत एक समझोता केला होता. ज्यानुसार ट्रम्प यांच्यासोबतच्या कथीत संबंधाबाबत मौन राखण्याचे ठरले होते. या समझोत्यासाठी स्ट्रॉर्मीला १ लाख ३० हजार डॉलर्स देण्यात आले होते. पण, परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण हा करार केला होता, असे स्टॉर्मी सांगते.