आकाशाचा हा रंग तुम्ही कधी पाहिला का? हे अद्भूत दृष्य तुम्हाला थक्कं करेल
एका दिवशी निसर्गाने चमत्कार दाखवला तो पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
Trending News - आपली पृथ्वी ही विविध रंगाने नटली आहे. हिरवगार निसर्ग, पर्वतांचे विविध रंग, निळा - हिरवा सुमद्र आणि निळेभोर आकाश. निसर्गातील काही गोष्टींचे रंग ठरले आहेत. झाडांची पाने हिरवी, सकाळी निळं दिसणारं आकाश रात्री काळं होतं. मात्र अचानक तुम्हाला एके दिवशी झाडांची पाने काळी किंवा समुद्राचे पाणी जांभळं दिसलं तर तुम्हा आश्चर्य वाटेल.
अंटार्क्टिकामध्ये काहीसा असाच चमत्कार झाला. निसर्ग पण कधी कधी असा काही चमत्कार करतो की त्याची कधी आपण कल्पनाही केली नसेल. अंटार्क्टिकामधील लोकांनाही एका दिवशी निसर्गाने चमत्कार दाखवला तो पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर हे चित्र व्हायरल झाले आहेत. निसर्गाचा हा खेळ पाहून सोशल मीडियावर अनेक कल्पना मांडल्या जात आहेत.
या रंगाचं दिसलं आकाश
गार्जियनच्या रिपोर्टनुसार, आकाशाचं हे दृष्य अगदी अनोखं होतं. असं वाटतं होतं हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनची सावली या आकाशाला मिठी मारत आहे. आपण आकाश काय निळा रंगाचं पाहिलं आहे. पण अचानक आकाशाचं रंग गुलाबी आणि जांभळा दिसला तर काय होईल. हे दृष्य पाहून अंटार्क्टिकामधील रहिवासी घाबरून गेले. आकाशाचे हा अनोखा दृष्य साइंस टेक्नीशियन स्टुअर्ट शॉने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्यांनी हा फोटो सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. या फोटा त्यांनी कॅप्शन दिलं आहे, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण या फोटोला एडिट केलं नाही आहे आणि दृष्य अविश्वसनीय आहे.
गेल्या आठवड्यात अंटार्कटिकामध्ये आकाश हे गुलाबी आणि जांभळ्या रंगाचं दिसलं. ज्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आकाशाचं हे रुप बघायला खूप विचित्र होतं. जणू काही या सावलीने संपूर्ण परिसराला वेढलं होतं. ही घटना दुर्मिळ आहे पण आकाशाचा हा गुलाबी रंग पूर्णपणे नैसर्गिक होता.
गॉर्जियनच्या रिपोर्टनुसार ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर सल्फेट पार्टिकल्स समुद्री मीठ आणि पाण्याची वाफ यांच्यापासून तयार झालेल्या एरोसोल हवेत फिरतात. तसंच ते सूर्यप्रकाशात विखुरतात. त्यामुळे आकाश गुलाबी, जांभळा आणि निळा रंगांनी न्हाऊन निघतो. त्यामुळे अंटार्कटिकातील आकाश त्यादिवशी गुलाबी रंगाचं दिसलं होतं.