मुंबई : आज २१ जून या वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. आज सूर्यास्त उशीरानं झालेला दिसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच दिवसाला सोल्सटाईस (solstice) असंही म्हटलं जातं. आज सूर्योदय सकाळी ५.२३ आणि सूर्यास्त सायंकाळी ७.२१ वाजता होणार आहे. म्हणजेच भारतात आज जवळपास १३ तास, ५८ मिनिटे आणि ५९ सेकंद सूर्यप्रकाश कायम राहिल. या दिवशी सूर्याची किरणे अवकाशात कर्करेषेच्या (ट्रॉपिक ऑफ कँसर) वर सरळरेषेत असतात.  


सोल्सटाईस संपूर्ण जगात एकाच वेळी होतो. नॉर्दन हेमिस्फिर (उत्तर गोलार्धात) राहणाऱ्या लोकांसाठी आजपासून उकाड्याचीही सुरुवात होईल. तर साऊथ हेमिस्फिर (दक्षिण गोलार्धात) राहणाऱ्या लोकांसाठी हा थंडीच्या महिन्यांची सुरुवात असेल.


२० जून, २१ जून किंवा २२ जूनपैंकी कोणताही दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरू शकतो. 


सध्या रमजान महिना सुरु आहे. मुस्लिम बांधव या महिन्यात सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रोजे पाळतात... जे लोक हाय अल्टिट्युड (समुद्रसपाटीपासून उंचावरच्या) असणाऱ्या देशांत राहतात (उदाहरणार्थ. आइसलँड, स्वीडन, नॉर्वे) त्यांचा रोजा आज जवळपास २० तासांचा असतो.