सुमो लहान मुलांना रडवतात, आणि मनमुराद हसतात...पण असं का?
जगभरात अनेक प्रथा परंपरा असतात. जपानमध्ये देखील `ऐकावे ते नवलच` अशा प्रथा आहेत.
टोकियो : जगभरात अनेक प्रथा परंपरा असतात. जपानमध्ये देखील 'ऐकावे ते नवलच' अशा प्रथा आहेत. येथे आगळ्या वेगळ्या प्रथा आहेत. जपानमधील सुमोंची ही प्रथा सर्वांना हैराण करणारी आहे. जपानमधील सुमो पहेलवानांमध्ये ही प्रथा आहे. सुमो पहेलवान एका परंपरेनुसार आपल्या मुलांना रडवण्याचा प्रयत्न करतात, आणि जेव्हा त्यांची मुलं रडतात, तेव्हा सुमो खूप मनापासून हसतात. विशेष म्हणजे हे मुलं जोपर्यंत रडत नाहीत, तोपर्यंत सुमो त्यांच्या मुलांना रडवण्याचा प्रयत्न करतात. मुलांना रडवायचं आणि स्वत: मनमुराद हसायचं, असं उगाचंच सुमो करतात असं नाही. त्यासाठी देखील एक कारण आहे आणि सुमो असं मुलांना रडवण्याचं काम कधीही करत नाहीत, म्हणजे उठसुट मुलांना रडवत बसतात, असे प्रकार सुमो करत नाहीत.
जपानचे सुमो हा मुलं रडवण्याचा नसता उद्योग का करतात?
जपानचे सुमो हा मुलं रडवण्याचा नसता उद्योग का करतात? असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीय, त्यांची ती एक परंपरा आहे. नाजीकूमो हा त्यांचा फेस्टीवल असतो, त्या दरम्यान ते आपल्या मुलांना खूप रडवतात, जोपर्यंत मुलं रडत नाहीत, तोपर्यंत ते मुलांना रडवतात. सेनसोजी मंदिरासमोर हा फेस्टीवल असतो, त्यात ते मुलांना रडवतात, अनेक जण आपली मुलं रडवण्यासाठी सुमोंच्या हातात देतात. मोठ्या उत्साहात हा फेस्टीवल पार पडतो. ही परंपरा अतिशय जगावेगळी वाटत असली तरी हे काम सुमो करत असतात.
लहान मुलांना रडवण्यामागे आहे महत्वाचं कारण
सुमो या दरम्यान एक वर्तुळ बनवतात, त्यात आपल्या लहान मुलांना देखील आणतात, यानंतर जोर जोराने या मुलांना हे सुमो रागवतात, यानंतर ही मुलं घाबरून रडायला लागतात, मुलांच्या रडण्याला शुभ मानलं जातं. सुमो मुलांना खूप रडवतात आणि स्वत: मनमुराद हसत एकमेकांना शुभेच्छा देतात, सुमोंची ही परंपरा ४०० वर्ष जुनी आहे, मुलांना रडवलं, तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं, असा त्यांचा समज आहे. म्हणून मुलं रडले तर ते दु:खी होत नाहीत, उलट आनंदी होतात.