सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, `या` देशात महिलांसाठी गर्भपात करणे कायदेशीर
गर्भपातासंदर्भात मतदान करताना 8 न्यायाधीशांनी त्याच्या बाजूने मतदान केले.
मेक्सिको : मेक्सिको सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयात गर्भपाताला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता देशात गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. 11 पैकी आठ न्यायाधीशांनी सोमवारी गर्भपाताच्या बाजूने एकमताने मतदान केले. खरंतर, पूर्वी देशातील काही महिलांना फक्त गर्भपात झाल्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे.
बलात्कार पीडित महिलाही तुरुंगात
मेक्सिकोच्या कोहुइला येथे काही महिलांना गर्भपात केल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. काही महिला बलात्काराला बळी होत्या, ज्यामुळे त्यांनी गर्भपात केला होता. परंतु तरीही त्यांना ही शिक्षा भोगावी लागली.
गर्भपातासंदर्भात मतदान करताना 8 न्यायाधीशांनी त्याच्या बाजूने मतदान केले, तर 3 न्यायाधीशांचे असे मानने आहे की, असे कायदे पूर्णपणे असंवैधानिक आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर्टुरो जलदिवार म्हणाले, "सर्व मेक्सिकन महिलांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. सर्व महिलांच्या हक्कांसाठी हा इतिहासातील अविस्मरणीय क्षण आहे."
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता मेक्सिकोच्या न्यायालयांच्या सर्व न्यायाधीशांना त्याचे पालन करावे लागेल. कॅथोलिकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला मेक्सिको हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. आता देशातील 32 राज्यांमध्ये राहणाऱ्या लाखो महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
निकालानंतर या लॅटिन अमेरिकन देशात उत्सवाचे वातावरण आहे आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांना हा त्यांचा मोठा विजय असल्याचे म्हणत आहेत. तथापि, अलिकडच्या वर्षांत मेक्सिकोमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण गेल्या वर्षी जेव्हा अर्जेंटिनामध्ये महिलांना गर्भपाताचे अधिकार देण्यात आले होते, तेव्हा मेक्सिकोमध्ये वादविवाद तीव्र झाला.
अर्जेंटिनाची स्थिती काय?
मेक्सिकोमध्ये लाखो महिलांनी यासाठी निदर्शने केली आणि त्यांनीही तोंडावर हिरवे कापड घातले जे अर्जेंटिनामधील निदर्शनाचे वैशिष्ट्य बनले. अर्जेंटिनाच्या 4 राज्यांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा महिन्यांनतर गर्भपात करणे बेकायदेशीर नाही.