भारताने वैज्ञानिक तर पाकने दहशतवादी आणि जिहादी तयार केले - स्वराज
भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खडेबोल सुनावले आहे. आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.
वॉशिंग्टन : भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खडेबोल सुनावले आहे. आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले. जर हाच पैसा गरिबांसाठी वापरला असता तर तुमची गरिबी दूर होण्यास मदत झाली असती, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शांतीचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच दोन्ही देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानने काय तयार केले? पाकिस्तानने दहशतवादी संघटना तयार केल्या. निरपराध माणसांचे रक्त सांडवणारा पाकिस्तान आम्हाला मानवी हक्क काय असतात हे सांगत आहे, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानला खेडबोल सुनावलेत.
जेव्हा ते बोलत होते, तेव्हा ऐकणारे, 'लूक हू इज टॉकिंग', असे म्हणत होते, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. पाकिस्तानकडून दहशतवादाचा निषेध करणे हा केवळ दिखाऊपणा आहे. दहशतवाद नेमका ओळखून त्याच्याविरोधात लढणे अत्यंत गरजेचे आहे याकडेही त्यांनी उपस्थित जगभरातील प्रतिनिधींचे लक्ष वेधले.
झी २४ तास LIVE अपडेट
21:11 PM
वॉशिंग्टन : आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले - सुषमा स्वराज
21:10 PM
वॉशिंग्टन : सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले, जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचे भले होईल, त्यांचा विकास होईल.
21:08 PM
वॉशिंग्टन : दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? - सुषमा स्वराज
21:07 PM
वॉशिंग्टन :पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचे नाटक करत असतात, आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे - सुषमा स्वराज
21:06 PM
वॉशिंग्टन : पाकिस्तानला भारताचा टोला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झाले ते सर्वांना माहीत आहे - सुषमा स्वराज.
21:06 PM
वॉशिंग्टन : गरिबीला दूर करणे टिकाऊ विकासाचा मार्ग, भारत गरिबांना शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करत आहे - सुषमा स्वराज
21:05 PM
वॉशिंग्टन : हिंसाच्या घटना वाढत आहेत, दहशतवादी विचारधाराही वाढत चालली आहे - सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्र सभेत सुषमा स्वराज यांच्या भाषणाला सुरुवात.