Syrian Military Academy Drone Attack: जगाच्या पाठीवर घडणाऱ्या अनेक घटना आपल्याला हैराण करतात. काही घटना धक्का देऊन जातात. असाच एक प्रकार सीरियात घडल्याचं वृत्त समोर येत आहे. सीरियातील लष्करी शिक्षण संस्थेवर गुरुवारी एकत भयंकर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जवळपास 100 हून अधिक जणांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त आहे. अधिकृत सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. स्थानिक शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या होम्स येथे झालेल्या या हल्ल्यासाठी स्थानिक माध्यमांनी दहशतवादी संघटनांना कारणीभूत ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SANA या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सीरियातील लष्करानं एका अधिकृत पत्रकातून याबाबतची माहिती देत होम्स शहरात सशस्त्र दहशतवादी संघटनांनी लष्करातील अधिकाऱ्यांच्या पदवीदान सोहळ्यादरम्यानच हा हल्ला केल्याची बाब प्रकाशात आणली. 


नागरिक आणि लष्कराच्या सेवेत रुजू होऊ पाहणाऱ्यांचा मृत्यू 


सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सच्या माहितीनुसार या ड्रोन हल्ल्यामध्ये 100 हून अधिकजणांचा मृत्यू ओढावला आहे. यामध्ये 14 नागरिकांसह उर्वरित लष्करी पदवीधरांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. हल्ला इतका भीषण होता की यामध्ये 125 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ 


हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकांचा वापर करत हा हल्ला केला. ज्यानंतर लष्करानंही दहशतवादी संघटनांविरोधात शस्त्र हाती घेतली. सीरियामध्ये झालेल्या या भयंकर हल्ल्यानंतर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. 


कोणी घेतली हल्ल्याची जबाबदारी? 


सीरियामधील या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून सीरियामध्ये सुरु असणाऱ्या एकंदर घडामोडी पाहता या देशात असणारी अस्थिरता वैश्विक स्तरावर चिंता वाढवताना दिसत आहे.