Barcode Tattoo In Hand: अंगावर टॅटू गोंदणं हे आता सर्वसामान्य बाब आहे. नुकतंच अर्जेंटिनातील एका जोडप्यानं संपूर्ण अंगावर टॅटू गोंदत विक्रमाची नोंद केली होती. त्यांनी त्यांच्या शरीरातील 98 टक्के भागावर गोंदवलं आहे. आता ही बातमी लोकांच्या विस्मरणात जात नाही तोच एका टॅटूची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा टॅटू साधा नसून एक बारकोड आहे. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण ही बातमी खरी आहे. खरं तर बारकोड सुविधा उत्पादन आणि किंमत स्कॅन करण्यासाठी वापरली जाते. हा बारकोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट केलं जातं. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पेमेंटचं महत्त्व वाढलं आहे. रोख रकमेऐवजी ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. पण तैवानमधील एका व्यक्तीने हा बारकोड हातावरच गोंदत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 


का गोंदला हातावर बारकोड?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी त्याने हातावर बारकोड टॅटू गोंदला. कारण त्याला प्रत्येक वेळी तिचा फोन काढण्यास कंटाळा येत होता. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसला ना! पण ही बातमी खरी आहे. खिशातून वारंवार फोन काढायला लागू नये यासाठी त्याने ही आयडिया वापरली आहे. खिशातून वारंवार फोन काढून तो पुरता वैतागला होता. त्यामुळे त्याने हा विचित्र पर्याय शोधून काढला.



बातमी वाचा- FIFA WC 2022: जापानचा 'तो' गोल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, जर्मनीला बसला असा फटका


जेव्हा जेव्हा कोणी पेमेंटसाठी विचारणा करायचं तेव्हा तो टॅटू गोंदवलेला हात दाखवतो. टॅटू गोंदवलेल्या व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलं नाही. मात्र असं असूनही तैवानमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याची आयडियाची कल्पना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'डीकार्ड'वर व्हायरल झाली आहे. सोशल मीडिया अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, हा टॅटू बनवण्याचा खूप दिवसांपासून विचार करत होता. त्यानंतर त्याला ही अनोखी कल्पना सुचली.