काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींना ताबा मिळवला आहे. त्यानंतर तालिबानने दावा केला की जर्मनी त्यांना मानवतावादी आधारच्या  स्वरूपात आर्थिक मदत करणार आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार त्यांचे वरिष्ठ नेते आणि जर्मन दूतावासात झालेल्या बैठकीत यावर मान्यता मिळाली आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, जर्मनी केवळ अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीसाठी शेकडो दशलक्ष युरो पुरवणार नाही तर त्यामध्ये वाढ देखील करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानचे नेते  शेर मुहम्मद अब्बास (Sher Muhammad Abbas) यांनी जर्मनचे मार्क्स पोएट्ज़ेल (Marx Poetzel) यांची भेट घेतली. ही बैठक 19 ऑगस्टला झाल्याची माहिती हाती लागत आहे. बैठकीत, जर्मन राजदूताने आश्वासन दिले की जर्मनी अफगाणिस्तानला मानवतावादी मदत चालू ठेवेल आणि त्यामध्ये वाढ देखील करण्यात येईल.


महत्त्वाचं  म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जेव्हा 17 ऑगस्ट रोजी तालिबानची सत्ता स्थापन झाली तेव्हा जर्मनने घोषणा केली होती की अफगाणिस्ताना दिली जाणारी मदत बंद करण्यात येईल. जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेमियर म्हणाले की, काबूलमधून पळून जाणाऱ्या लोकांची चित्रे पाश्चिमात्य देशांसाठी लाजिरवाणी आहेत.


ते पुढे म्हणाले, ही मानवी शोकांतिका आहे आणि आपण सर्वांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सांगायचं झालं तर जर्मनी असा दुसरा देश आहे, ज्याठिकाणी अमेरिकेनंतर त्यांचे अधिक सैनिक आहेत. 


जर्मन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार,  सरकारने अफगाणिस्तानला देणात येणारी आर्थिक मदत 2021 मध्ये 430 दशलक्ष युरोपर्यंत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तालिबानच्या या दाव्यावर जर्मनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एवढंच नाही तर जर्मननंतर चीन, रूस आणि पाकिस्तान सारखे देश ही तालिबान राजवट स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत मिळात आहेत.