काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा माघारी परतत आहेत. तर तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच तालिबानी नेते भारतासोबत मैत्रीची भाषा बोलू लागले आहेत. भारतासोबत मैत्रीची भाषा करण्यामागे नेमकं कारण काय आहे, तालिबान्यांना भारतासोबत मैत्री का करायची आहे, हे आपण जाणून घेऊयात. (Taliban leaders have called for friendly relations with India)
  
अफगाणिस्तानात सत्तास्थापनेसाठी तालिबानच्या हालचाली सुरू झाल्यायेत. अशातच तालिबानी नेत्यांनी भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा सूर काढलाय. भारतासोबत व्यापार-आर्थिक संबंध पूर्वीप्रमाणेच हवेत, असं मत तालिबानी नेते शेर मोहम्मद स्टॅनेकझई यानं व्यक्त केलंय. दिल्ली-काबूलदरम्यान कार्गो विमानसेवाही पूर्ववत करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. एव्हढंच नव्हे तर भारताविरोधात अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुणालाही करू देणार नाही,  असं सांगून त्यांनी दहशतवादी संघटना लष्कर आणि जैशला दणका दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहेत शेर मोहम्मद स्टॅनेकझई ? 


शेर मोहम्मद स्टॅनेकझई तालिबानच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शेरू या नावानं त्यांना ओळखलं जातं. तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना सहभागी करून घेतलं जाण्याची शक्यता आहे. शेजारील देशांसोबत तालिबानचे चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी शेर मोहम्मद विशेष प्रयत्नशील आहेत. 


दहशतीच्या जोरावर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला खरा, मात्र सत्ताधीश म्हणून त्यांना मान्यता नाही. जगभरात आपण एकाकी आहोत याची त्यांना जाणीव झाली असावी. त्यामुळेच तालिबान्यांनी आता मैत्रीची भाषा बोलायला सुरूवात केली आहे.