तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे निवेदन, सांगितले नवीन सरकार कसे काम करणार
Afghanistan: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) आपले सरकार घोषित केले आहे. यासोबतच तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) याचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
काबूल : Afghanistan: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan) आपले सरकार घोषित केले आहे. यासोबतच तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) याचे वक्तव्य समोर आले आहे. तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याने पहिले विधान केले आहे. भविष्यातील अफगाणिस्तान त्याच्या अधिपत्याखाली कसे असेल. नवीन सरकार कसे काम करेल याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दिलेल्या निवेदनात अखुंदजादा म्हणाले की, नवीन सरकार लवकरच कामकाज सुरू करेल आणि शरिया कायदा येथे कायम राहील.
तालिबान्यांची अफगाणिस्तानात हंगामी सरकार स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. मुल्ला हसन अखुंदजादा हा तालिबानी नेता पंतप्रधान होणार आहे. मुल्ला अब्दुल बरादर उपपंप्रधान असणार आहे. तर सिराज उद्दीन हक्कानी गृहमंत्री असणार आहे.
मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विश्वास ठेवा
निवेदनात म्हटले आहे की, तालिबान (Taliban) सर्व आंतरराष्ट्रीय कायदे, करार आणि इस्लामिक कायद्याच्या विरोधात नसलेल्या ठरावांसाठी वचनबद्ध आहे. तालिबान शरियाच्या चौकटीत राहून सर्व देशवासियांना धार्मिक आणि आधुनिक विज्ञानासाठी निरोगी आणि सुरक्षित वातावरण प्रदान करेल. त्याचवेळी, तालिबान इस्लामच्या कार्यक्षेत्रात मानवी हक्क, अल्पसंख्यांकांच्या हक्कांसह वंचित लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गंभीर आणि प्रभावी पावले उचलेल.
'परदेशी मुत्सद्यांनी घाबरण्याची गरज नाही'
तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने हे देखील स्पष्ट केले आहे की, तालिबानच्या (Taliban) अधिपत्याखाली अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाच्या सुरक्षेच्या विरोधात वापरली जाणार नाही. मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा यांनी आपल्या निवेदनात आश्वासन दिलेय की, सर्व परराष्ट्र मुत्सद्दी, दूतावास, वाणिज्य दूतावास, मानवतावादी संस्था आणि गुंतवणूकदार यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरण प्रदान केले जाईल.
Afghan सोडून लोकांनी जाऊ नये!
तालिबानने (Taliban) म्हटले आहे की, सरकार डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसारख्या हुशार आणि व्यावसायिक लोकांना महत्त्व देईल. देशाच्या विकासात त्यांची गरज आहे. तालिबानने लोकांना देश सोडू नका, असे आवाहन केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या राजवटीत प्रत्येकजण सुरक्षित आहे, त्यामुळे कोणालाही अफगाणिस्तान सोडण्याची गरज नाही. सर्वोच्च नेत्याच्या वक्तव्याने माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी बोलले, परंतु इस्लामच्या शिकवणीचा प्रसार केला पाहिजे हे देखील स्पष्ट केले.
बंदुकीने सत्ता काबीज केली, आता शांततेसाठी चर्चा
बंदुकीच्या आधारावर सत्ता मिळवलेल्या तालिबानने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याला एक शांत, समृद्ध आणि आत्मनिर्भर अफगाणिस्तान हवा आहे, यासाठी देशातील युद्ध आणि संघर्षाची सर्व कारणे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशवासी पूर्ण सुरक्षिततेने आणि आरामात जगू शकतील. सर्वोच्च नेत्याने असेही म्हटले आहे की, नवीन सरकारला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू.