काबूल : तालिबानने अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. पण बंदूकीच्या जोरावर वर्चस्व दाखविण्याची  त्यांची जुनी सवय अद्यापही गेलेली नाही. तालिबानी दहशतवाद्यांनी आता काबूल स्थित नॉर्वेचा दुतावास काबीज केला आहे. शस्त्रांसह तालिबानी दूतावासात घुसले आणि सर्वकाही ताब्यात घेतले. तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर सांगितले की परदेशी राजकारणी आणि दूतावासांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरण प्रदान केले जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानच्या या कृत्याबद्दल इराणमधील नॉर्वेचे राजदूत सिग्वाल्ड हॉज यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी तालिबानचे काही फोटो देखील शेअर केले आहे. ते ट्विट करत म्हणाले, 'तालिबानने आता काबूलमधील नॉर्वे दूतावासाचा ताबा घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की दूतावास नंतर परत केला जाईल. प्रथम ते दारूच्या बाटल्या आणि मुलांची पुस्तके नष्ट करेल...'



तालिबान सुरुवातीपासूनच मुलांच्या शिक्षणाच्या विरोधात आहे. तालिबान आता मोठ्या गोष्टी करत असले तरी, वास्तव असं आहे की त्यांना मुलांनी शिक्षण घेणं त्यांना आवडत नाही. विशेषत: शाळेत जाणाऱ्या मुली. मुलींनी शिक्षण घेवून नोकरी करण इस्लामविरोधी असल्याचं त्याचं म्हणणं आहे.


तालिबान राजवटीच्या शिक्षणमंत्र्यांनी स्वतःच त्यांचे 'ज्ञान' दाखवून दिले आहे. शेख मोल्वी नूरुल्ला मुनीर यांच्या दृष्टीने पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीला काही किंमत नाही. त्यांनी अलीकडेच सांगितले की, सत्तेपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही, तालिबानींनी बळावर सत्ताही मिळवली आहे. एकंदर पाहाता अफगाण नागरिक सध्या जीव मुठीत घेवून जगत आहेत.