तालिबान्यांनी अफगाणिस्तानात फाडला पाकिस्तानचा झेंडा, पाहा व्हिडीओ
गळेपडू पाकिस्तानला तालिबान्यांनी असं धुडकावलं, झेंड्याचाही अपमान....पाहा व्हिडीओ
काबुल: पाकिस्तान सातत्याने जगासमोर तालिबान्यांच्या बाजूनं बोलताना दिसतंय अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे तालिबानी मात्र पाकिस्तानला उडवून लावत असल्याचं दिसत आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तालिबानी चक्क पाकिस्तानच्या विरोधात आहेत की काय असा प्रश्नच हा व्हिडीओ पाहून पडला आहे.
हा व्हिडीओ Murtaza Ali Shah यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की तालिबानी तरुण दिसत आहे. एका उभ्या असलेल्या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. तालिबानी तरुण हा झेंडा काढून फाडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तालिबानचे तरुण पाकिस्तानचा झेंडा पाहून संतापलेले या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ अफगाणिस्तानातील असल्याचंही सांगितलं जात आहे. 'झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.'
तालिबानच्या मते, अफगाणिस्तानमध्ये कोणतं सरकार स्थापन करण्यात येईल याची मागणी करण्याचा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला अधिकार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा सल्ला दिला होता. पण तो तालिबानने स्वीकारला नाही.
तालिबानचे प्रवक्ते आणि उपसूचना मंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी डेली टाइम्सला सांगितले की, पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही. त्यावरून हे स्पष्ट होतं की तालिबान्यांना पाकिस्तानशी संगनमत करायचं नाही.