काबूल : वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे अफगाण नागरिकांमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे. तालिबानी आता नागरिकांच्या घरात घुसून मुलींना घेवन जात आहेत. तालिबानी मुलींच्या इच्छे विरूद्ध लग्न करत आहेत तर काही मुलींना त्यांनी दुसऱ्या देशात पाठवलं आहे. नुकताचं तालिबानी बदख्शां प्रांतातील एका गावात पोहोचले आणि वडिलांच्या डोळ्यादेखत त्यांनी 21 वर्षांच्या मुलीला पळवून घेवून गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा त्या हतबल वडिलांनी मुलीला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण त्यांच्या हाती निराश आली.  'द सन'ने पत्रकार होली मैके (Hollie McKay)यांच्या माध्यमातून या धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे. तालिबानी सर्वांच्या घरात जावून पत्नीच्या शोधात आहेत. जी मुलगी त्यांना आवडते तालिबानी त्या मुलीला इच्छेविरूद्ध घेवून जात आहेत. 


अफगाणी मुलगी फरीहा ईजरच्या (Fariha Easer) मैत्रीणीसोबत देखील असचं झालं आहे. फरिहाने पत्रकार मके यांना सांगितले की, काही दहशतवादी बदख्शां प्रांतात राहणाऱ्या तिच्या मित्रीणीच्या घरी पोहोचले आणि जबरदस्तीने तिला सोबत नेले. दहशतवाद्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितले की आम्ही इस्लामचे रक्षक आहोत आणि तुमची मुलगी आम्हाला पत्नी म्हणून हवी आहे. 


तालिबानने असेही म्हटले की त्याचा एक साथीदार मुल्ला आहे, म्हणून त्याने लग्नासाठी ताबडतोब आपल्या मुलीला सोपवावे.घाबरलेल्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत मागितली, पण त्यांच्या हाती निराश आली. वडिलांना सांगण्यात आले की तुम्हाला जे करायचे आहे ते स्वतः करा. यानंतर तालिबान्यांनी जबरदस्तीने वडिलांच्या 21 वर्षीय मुलीला सोबत घेतले. आता हतबल झालेल्या वडिलांनी छोट्या मुलीसह पलायन केलं आहे.