काबूल : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानचे राज्य स्थापन झालंय.लवकरच त्यांचं सरकार स्थापन होणार आहे. तेव्हापासून जगातील जवळजवळ प्रत्येक देश या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. तालिबान सरकारची घोषणा झाल्यापासून काही प्रमुख नेत्यांविषयी जोरदार चर्चा आहे. त्यापैकी एक शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजई (Sher Mohammad Abbas Stanekzai). शेर मोहम्मद हे अफगाण तालिबानचे वरिष्ठ नेते आहेत. तालिबानची 2001 मध्ये  सत्तेवरून हकालपट्टी झाली. तेव्हापासून ते दोहा येथे राहत आहे. (talibani leader sher mohammad abbas stanekzai trained from indian military academy) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेर मोहम्मद हे कट्टर धार्मिक नेते असल्याचं म्हटलं जातं. त्यांना 2015 मध्ये दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचं प्रमुख बनवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तान सरकारसोबत शांतता चर्चेत भाग घेतला. याशिवाय, ते अमेरिकेबरोबरच्या शांतता करारामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आतापर्यंत अनेक देशांच्या राजकीय दौऱ्यांमध्ये तालिबानचे प्रतिनिधित्व केले आहे.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शेर मोहम्मद यांचे भारताशीही संबंध आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये अफगाण सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतलं होतं.


सुशिक्षित शेर मोहम्मद


असं म्हटलं जातं की, शेर मोहम्मद हे त्यांच्या भाषणात आयएमएककडून (indian military academy) प्रशिक्षण घेतल्याचा उल्लेख करतात. तालिबानच्या इतर नेत्यांच्या तुलनेत शेर मोहम्मद यांना संयमी मानलं जातं कारण ते सुशिक्षित आहेत. बहुतेक नेत्यांनी अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानातील मदरशांमधून शिक्षण घेतलंय. अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतातील बारकी बराक जिल्ह्यात 1963 मध्ये  शेर मोहम्मद यांचा जन्म झाला.
 
आयएसआयकडून प्रशिक्षण 


आयएमएपूर्वी त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होतं. पण नंतर तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI मध्ये सामील झाला. शेर मोहम्मद अब्बास यांनी पाकिस्तानी लष्कर आणि त्याची गुप्तचर संस्था ISI कडून प्रशिक्षण घेतलं. शेर मोहम्मद अब्बास 1996 मध्ये अमेरिकेत गेले.असंही म्हटलं जातं की त्यांचे ISI शी घनिष्ठ संबंध आहेत. दरम्यान तालिबानच्या नवीन सरकारमध्ये त्यांना कोणतं पद मिळेल, याबाबत निश्चितता नाही. त्यामुळे त्यांना काय जबाबदारी मिळते, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.