Sharia Rules | तालिबानची पहिली पत्रकार परिषद, शरियत कायदा आणि महिलांच्या अधिकाराबाबत यू-टर्न?
तालिबानने (Talibans) अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्यानंतर 17 ऑगस्टला पहिली पत्रकार परिषद (Talibans first press conference) घेतली.
काबूल : तालिबानने (Talibans) अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्यानंतर 17 ऑगस्टला पहिली पत्रकार परिषद (Talibans first press conference) घेतली. तालिबान्यांनी या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरुन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच अनेक विचारही सांगितले. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता तेथील जनजीवनासह विशेषत: महिल्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, त्यांना शरियत कायद्याचे (Sharia Rules) पालन करावे लागणार का, याबाबतही तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदी (zabihullah mujahid) यांनी स्पष्ट केलं. (Talibans first press conference Women have rights under sharia rules)
जबीहुल्ला काय म्हणाला?
आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाशी कोणत्याही प्रकारचं वैर नकोय. आम्हाला आमच्या धार्मिक श्रद्धांनुसार वागण्याचा अधिकार आहे. इतर देशांचे दृष्टिकोन, नियम आणि कायदे वेगळे आहेत. आमच्या मूल्यांनुसार, अफगाणांना त्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे ठरवण्याचा अधिकार आहे”, असं मुजाहिदीने नमूद केलं.
"शरिया कायद्यानुसार महिलांचे अधिकार निश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महिला आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून सोबत काम करणार आहेत. आम्ही महिलांसोबत कोणताही भेदभाव करणार नाहीत", असा विश्वास मुजाहिदीने जगाला दिला आहे.
"आम्ही आमच्या व्यवस्थेमध्ये महिलांना काम करण्याची आणि शिक्षणाची परवानगी देणार आहोत. महिलांचा आता समाजात सक्रिय सहभाग होणार आहे", असंही मुजाहिदीने स्पष्ट केलंय.