Viral Video: हॅलो म्हणणारा Dog चा सोशल मीडियावर धुमाकूळ
Dog Video : प्रत्येक Dog ची एक खासियत असते. मात्र सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचं लक्ष वेधणारा हा Dog ची खासियत पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
Talking Dog Video : Dog प्रेमींसाठी खास बातमी...अनेकांच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाच्या तरी घरात Dog असतो. एकद गोंडस आणि क्यूट दिसणारा हा कुत्रा अतिशय लोभसवाणा असतो. त्यांच्या सोबत खेळताना आपल्या दिवस भराचा थकवा कसा नाहीसा होतो. हे गोंडस दिसणारे कुत्रे आपल्या घरातील एक सदस्य असतात. सध्या सोशल मीडियावर एका Dog ने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
नक्कीच असा Dog तुम्ही पाहिला नसेल?
प्रत्येक Dog ची एक खासियत असते. मात्र सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचं लक्ष वेधणारा हा Dog ची खासियत पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. या Dog चं टॅलेंटच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कुत्रा मालकिनसोबत पार्कमध्ये उभे आहेत. दोघेही वरच्या दिशेने बघत आहेत आणि इतक्यात ती महिला ओरडते 'हॅलो' मालकिनीचं पाहता पाहता पुढच्या क्षणाला तो कुत्राही बोलतो. हो, बोलतो मुलगी दोन-तीन वेळा हॅलो म्हणते आणि कुत्राही 'हॅलो' म्हणत असतो.
आश्चर्यकारक व्हिडीओ
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर इंटरेस्टिंग कॅप्शन देत युजरने लिहिले आहे की, 'हॅलो, हॅलो… तिथे कोणी आहे का?.'