पर्सनल ट्यूशन देण्यासाठी जात होती शिक्षिका, 14 वर्षाच्या मुलावर 3 वेळा अत्याचार
39 वर्षीय विवाहित शिक्षिका वासनेत इतकी आंधळी झाली की तिने 14 वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबर अत्यंत लज्जास्पद कृत्य केले.
नवी दिल्ली : एका शिक्षिकेचे असे लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुलाला शिकवण्याबरोबरच चांगली मूल्ये देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकाने अत्यंत आदरणीय शिक्षकाचा दर्जा कलंकित केला. 39 वर्षीय विवाहित शिक्षिका वासनेत इतकी आंधळी झाली की तिने 14 वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबर अत्यंत लज्जास्पद कृत्य केले.
विवाहित शिक्षिकेची लाजिरवाणी कृती
द सनच्या वृत्तानुसार, 39 वर्षीय शिक्षक क्रिस्टल जॅक्सन विवाहित आहे. तिने कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू इंडिपेंडंट स्कूलमध्ये एक फ्रीलान्स शिक्षक म्हणून काम करत होती. तसेच ती वन-टू-वन सेशनसाठी देखील जात होती. DLA मध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलावर या शिक्षिकेची नियम बिघडली.
क्रिस्टल जॅक्सनने कॅलिफोर्नियामध्ये 14 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिक्षिकेने मुलाला एकदा नव्हे तर तीनदा लैंगिक शोषण केले. कॅलिफोर्नियाच्या इंटरनेट क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रेन (आयसीसी) टास्क फोर्सला शिक्षिकेच्या गलिच्छ वर्तनाबद्दल सुगावा सापडला आहे. यानंतर शिक्षिकेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणाच्या तपासाला एक वर्ष चालला. या तपासादरम्यान, हे समोर आले की शिक्षिकेने मुलासोबत अश्लील कृत्य केले. एका वर्षानंतर क्रिस्टल जॅक्सनला दोषी ठरवल्यानंतर अटक करण्यात आली. मात्र, नंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगा सुखरूप आहे, शिक्षिकेने इतर मुलांनाचं ही लैंगिक शोषण केलंय का याचा ही तपास केला जात आहे.