बीजिंग : ज्या कर्मचाऱ्याला प्रेमळ बॉस मिळतो तो नशिबान असतो, अशी चर्चा नोकरदार वर्गात नेहमीच असते. पण, सर्वांनाच असा बॉस भेटेल असे नाही. चीनमधील एका कर्मचाऱ्याला असाच एक विक्षिप्त बॉस मिळाला. बॉसचा हाच विक्षिप्तपणा त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील एका  कंपनीतील एक महिला कर्मचारी उशीरा कामावर आली. कर्मचारी उशीरा आल्याचे पाहताच बॉसचा विक्षिप्तपणा जागा झाला. त्याने त्या महिला कर्मचाऱ्याला १०० बैठका काढण्यास सांगितले. हा बैठकांचा ताण आल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. जिओ फेई असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. बैठका काढल्यावर या महिलेला पुढचे १० दिवस जागेवरून हालताही आले नव्हते. तसेच, तिला श्वसनाचा विकारही जडला.


महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलीची प्रकृती ठिक नव्हती म्हणून ही महिला औषधे आणण्यासाठी गेली होती. दरम्यन, तिला कामावर यायला उशीर झाला. कामावर उशीरा आल्यावर बॉसने तिला शिक्षा दिली. महिलेच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर कंपनीच्या वतीने के क्वांग नावाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, या महिलेने या बैठका शिक्षेसाठी नव्हे तर, व्यायामासाठी काढल्या होत्या.