टेक्सास  :  अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परंतू त्यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने ड्रग्ज दिले आण त्यानंतर जे काही केले. ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 टेक्सासमध्ये एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीला ड्रग्ज देऊन आणि तिच्या कपाळावर बंदूक ठेऊन सलग 5 दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
 
 डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, बुधवारी 34 वर्षीय आरोपी मायकलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर अपहरण, बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.


 अल्पवयीन मुलीचा जबाब


 पीडित मुलीने सांगितले की, 27 मार्च आरोपी मायकलने तिचे अपहरण केले. तिला एका स्टोअर युनिटमध्ये डांबून ठेवले. जबरदस्ती ड्रग्ज दिले. आणि बंदूक कपाळावर ठेऊन सलग 5 दिवस बलात्कार केला.


पोलिसांची चौकशी सुरू


 पोलिसांनी सांगितले की, 5 दिवस बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला सोडून दिले. पीडित आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. पीडिताने आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर एका आठवड्याने पोलिसात तक्रार दाखल केली. या सर्व बाबींची पोलीस चौकशी करीत आहेत.