टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव याने आपण 100 हून अधिक जैविक मुलांचे बाप असल्याचं म्हटलं आहे. त्याने मेसेजिंग ॲपवर ज्याचे 5.7 दशलक्ष सब्सक्राइबर्ससह हे शेअर केले. तो म्हणाला, "मला नुकतेच सांगण्यात आले की, मला 100 पेक्षा जास्त जैविक मुले आहेत. ज्या माणसाने कधीही लग्न केले नाही आणि ज्याने एकटे राहणे पसंत केले त्याच्यासाठी हे कसे शक्य आहे?" असा देखील प्रश्न विचारला जात आहे. 


पावेल 15 वर्षांपूर्वी होता स्पर्म डोनर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावेल दुरोव म्हणाला की, सुमारे 15 वर्षांपूर्वी एका मित्राने त्याला एक विचित्र विनंती केली होती. "तो म्हणाला की त्याला आणि त्याच्या पत्नीला प्रजनन क्षमतेच्या समस्यांमुळे मुले होऊ शकत नाहीत आणि त्याने मला एका क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करण्यास सांगितले जेणेकरून त्यांना मूल होईल. सुरुवातीला मी हे ऐकून हसायला लागलो, पण नंतर मला जाणीव झाली की, ही त्यांच्यांसाठी खरोखरच एक गंभीर बाब आहे."



पावेल पुढे म्हणाला की, क्लिनिकच्या बॉसने त्यांना सांगितले की उच्च गुणवत्ता असलेल्या स्पर्म डोनरची अनेकदा कमतरता जाणवते. तसेच तुम्ही शुक्राणू दान करुन मुलं होत नसलेल्या दाम्पत्याला मदत करु शकता. अशापद्धतीने दुहेरी मदत करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला. 


''2024 पर्यंत मी शुक्राणू दान केल्यामुळे 12 देशांतील शंभराहून अधिक जोडप्यांना मुले होण्यास मदत झाली आहे. शिवाय, मी दाता बनल्यापासून आतापर्यंत किमान एक IVF क्लिनिकमध्ये अजूनही माझे दान केलेले शुक्राणू अज्ञात वापरासाठी उपलब्ध आहे. ज्या कुटुंबांना मुले होऊ शकत नाही. त्यांना मदत म्हणून या शुक्राणूचा वापर केला जातो. 


ही खूप मोठी जोखीम आहे. पण मी स्पर्म डोनर असल्याचा मला अजिबात खेद वाटत नाही. निरोगी शुक्राणूंची कमतरता ही जगभरात गंभीर समस्या बनली आहे. हे कमी करण्यात मी माझी भूमिका बजावली याचा मला अभिमान आहे. त्याची पोस्ट शेअर केल्यापासून 1.8 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आला, जिथे अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.