महिलेने दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली, १० जणांना मृत्यू
फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पॅरीस : फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पॅरीसमध्ये ४० वर्षांच्या एका महिलेने दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली. गाडीला लागलेली ही आग म्हणता म्हणता पसरली आणि तिने या आठ मजली इमारतीचा ताबा घेतला. मंगळवारी पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. या महिलेचे मानसिक संतुलन ढळल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. या अग्निकांडात ३६ जण जखमी झालेत.
आग लागलेल्या इमारत परिसर भागात वकिलातींची निवासस्थाने आणि अनेक संग्रहालये आहेत. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर दुपारपर्यंत आग आटोक्यात आणली. सुमारे ५० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असले तरी माथेफिरू महिलेच्या कृत्यामुळे १० जणांचा बळी गेला आहे. यातले काही जण होरपळून तर काही जण विषारी धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडलेत.
पॅरीसमधले गेल्या १४ वर्षांमधील हे सर्वात मोठी अग्निकांड ठरले आहे.