बँकॉक : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. पण काही देशांमध्ये कोरोना व्हायरस आता नियंत्रणात येत आहे. त्यामुळे अनेक कामांना देखील चालना मिळत आहे. याच दरम्यान थायलँडमधील चित्रपट सृष्टीतील काम रूळावर येत आहे. पण कोरोनाचं प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून  काही निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांच पालन करणं प्रॉडक्शन हाऊस आणि कलाकारांसाठी बंधनकारक असणार आहे.  साहसी दृष्य आणि लव्ह सीन्सचा वापर चित्रपटांमध्ये करू नये असे सरकारकडून सांगण्यात आलं आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द गार्जियन (The Guardian) दिलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हयरसवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे लादण्यात आलेले काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. शिवाय प्रॉडक्शन कंपन्याना देखील त्यांचे कामकाज करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत काम करण्याची मुभा सर्व प्रॉडक्शन कंपन्याना दिली आहे. 


उप-स्थायी संस्कृती सचिव Thawiwattanakit Bowon जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपट निर्मात्यांनी हवेशीर ठिकाणी काम केले पाहिजे. शुटींग दरम्यान ५० पेक्षा जास्त सदस्य कामाच्या ठिकाणी नसावेत. साहस दृष्य आणि लव्ह सीन्स शक्यतो टाळावे. कारण त्याच्यामुळे कोरोना पुन्हा बळावण्याची शक्यता आहे. 


असे दृश्य चित्रीत करण्यासाठी स्पेशल इफेक्ट किंवा वेगळ्या कॅमेरा ऍंगलचा वापर करावा. शिवाय कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या  कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रॉडक्शन हाऊसला देण्यात आल्या आहेत. 


त्याचप्रमाणे शूटिंगच्या ठिकाणी कलाकार आणि क्रू यांचे स्क्रिनिंग नियमित करावे. सेट पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये कमीतकमी दोन मीटर अंतर असलं पाहिजे. अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.