सध्याच्या घडीला इन्स्टाग्राम (Instagram) किंवा यूट्यूब (Youtube) सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  लोकांच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहेत. सोशल मीडियावर लोक प्रसिद्ध होऊन पैसे कमावतात. पण अनेकदा सोशल मीडिया किंवा यूट्यूबर्स स्टार्सही त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे चर्चेत येतात. अशीच एक  घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थायलंडमध्ये (Thailand) एका महिला युट्युबरने तिच्या फॉलोअर्सना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून सुमारे 400 कोटी रुपये परतावा देण्याचे आश्वासन देऊन पळ काढला आहे. वृत्तानुसार, या महिलेचे नाव नाथॅमन खोंगचक (Natthamon Khong)आहे. नाथॅमन इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर बऱ्याच काळापासून व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्यामुळे या नाथॅमन फॉलोअर्सची संख्या चांगलीच वाढली.


नाथॅमन खोंगचकचे Nutty's Diary नावाचे यूट्यूब चॅनल आहे. नाथॅमनचे 8 लाख 47 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नाथॅमन त्यावर डान्सचे व्हिडिओ पोस्ट करते. तसेच इन्स्टाग्रामवर नाथॅमनचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जिथे ती फॉरेक्स ट्रेडर्सच्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देत असते.


हळुहळू या नाथॅमन खोंगचकने तिच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. एकदा तिने सांगितले की तिचा एका गुंतवणूक कंपनीशी संबंध आहे. तसेच फॉलोअर्स पैसे गुंतवूण त्यांना फायदा करुन देऊ शकतो असे नाथॅमनने सांगितले.  नाथॅमनने फॉलोअर्सना जास्त नफ्याचे आश्वासन दिल्यानंतर अनेकांना पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर नॉथमनने फॉरेन एक्सेज स्कीमद्वारे हजारो फॉलोअर्सना आपल्या जाळ्यात अडकवले.


थाई माध्यमांच्या वृत्तानुसार, या नाथॅमनला गुंतवणुकीसाठी सहा हजारांहून अधिक लोकांनी पैसे दिले होते. नाथॅमनने फॉलोअर्सना 35 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय या महिलेने इतर अनेक लोकांचे पैसेही गुंतवले होते. एका वृत्तानुसार, महिलेला एकूण चारशे कोटी रुपये परत द्यायचे होते.


दरम्यान अचानक एके दिवशी नाथॅमन सर्व सोशल मीडिया अकाऊंट बंद करून गायब झाली. हे सर्व फॉलोअर्सनना कळल्यानंतर तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सर्वांनी पोलिसांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी आतापर्यंत 102 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ज्यात तक्रारदारांनी दावा केला आहे की त्यांचे सुमारे 6.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. थायलंड पोलिसांच्या एका युनिटने गेल्या आठवड्यात फसवणूक प्रकरणात नथामोनच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते.