दिल्ली : लडाख त्याच्या सौंदर्यासोबत एलियन्सच्या चर्चांमुळेही प्रसिद्ध आहे. इथे एक ठिकाण आहे ज्याला एलियनचा अड्डा म्हणून ओळखलं जातं. लडाखच्या 'कोंगका ला पास'मध्ये एक रहस्य आहे. इथे एलियन दिसल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. म्हणूनच या भागाला फ्लाइंग सॉसरचा आधार म्हणतात. हे समजून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडाखचा 'कोंगका ला पास' हा असा परिसर आहे जिथे कोणीही राहत नाही. एलियन्स खरोखर इथे येतात की नाही हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी 2004 मध्ये एक अभ्यास केला. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासादरम्यान लडाखच्या याच भागात एक रोबोट फिरताना दिसला. शास्त्रज्ञ त्या ठिकाणी पोहोचताच ती वस्तू गायब झाली होती.


सैन्याने एक गूढ गोष्ट पाहिली होती


हे पहिलं प्रकरण नव्हतं. २०१२ मध्ये भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनीही अशीच एक रहस्यमय गोष्ट पाहिल्याचं नमूद केलं होतं. लष्कराने दिल्ली मुख्यालयाला पाठवलेल्या अहवालात त्या भागात यूएफओ दिसल्याचं म्हटलंय.


शास्त्रज्ञांची विविध मतं


या संपूर्ण प्रकरणावर शास्त्रज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोंगका लाचा थर जगातील सर्वात जुना आहे. त्याची खोली उर्वरित जगाच्या दुप्पट आहे, हा एक अतिशय मजबूत खडक आहे. यामुळे UFO बेसची धारणा योग्य मानली जाते. 


काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, याठिकाणी एलियन किंवा यूएफओ असं काहीही नाही कारण इथे कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. ज्याच्या आधारे याची खातरजमा करता येईल.