मुंबई : रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनरने बाळाच्या रुपात एका मुलीला जन्म दिला आहे. डेलीमेल डॉट को डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार 20 वर्षाच्या रिअॅलिटी स्टारने रविवारी हा व्हिडिओ शेअर केला आहे. जेनर आणि तिचा बॉयफ्रेंड ट्रेविस स्कॉटने अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अद्याप तिने या बाळाचे नाव सध्या ठरवले नाही. 



सोशल मीडियावर तिने लिहिलं आहे की, माझ्या सुंदर आणि स्वस्थ मुलीने 1 फेब्रुवारी रोजी जन्म घेतला. ही आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचप्रमाणे जेनरने यासोबत एक व्हिडिओ लिंक शेअर केली आहे.  'टू आवर डॉटर' असं शीर्षक असलेला हा 11 मिनिटांचा व्हिडिओ आहे. 



इंस्टाग्रामवर एक लांब असं लेटर लिहून तिने आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे. प्रेग्नेंसी माझ्यासाठी खूप सुंदर आणि वेगळी आहे. या अगोदर मी ही भावना कधीच अनुभवली नव्हती. काहलीचं हे पहिलं बाळं आहे.