Israel Iron Beam News: आयरन डोमनंतर इस्राइलकडे आयरन बीम नावाचे नवीन घातक हत्यार येणार आहे. हे आयर्न बीम लेझर क्षेपणास्त्रे आणि रॉकेट नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. आयरन बीम शेकडो मीटर ते अनेक किलोमीटर अंतरावर प्रकाशाच्या वेगाने हल्ला करू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे फार कमी नुकसान होते. ७ ऑक्टोबर २०२३ ला झालेल्या हमासच्या हल्ल्यात १,२०६ लोक मारले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयरन बीम उच्च-शक्तीच्या लेसरचा वापर करून क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे एका वर्षांच्या आत सुरू होईल असे अहवालात म्हटले आहे. इस्रायली संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की ही लेझर संरक्षण प्रणाली देशाच्या आयर्न डोम आणि इतर संरक्षण प्रणालींना पूरक ठरेल आणि युद्धाच्या नवीन युगाची सुरुवात करेल.


आयरन बीम आहे धोकादायक 


 


इस्रायलने आयरन बीम 500 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त खर्च केला आहे. सध्या इस्रायलचे हवाई संरक्षण आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग आणि ॲरो डिफेन्स यांच्याद्वारे केले जाते. या सगळ्या हवाई संरक्षण यंत्रणा हवेतच क्षेपणास्त्रे नष्ट करतात. पण अनेक वेळा हमास, हिजबुल्ला आणि इराणच्या क्षेपणास्त्रांपुढे ही संरक्षण यंत्रणांना कमी पडली आहे. यामुळेच इस्रायल आता आणखी घातक शस्त्रे तयार करत आहे.


आयर्न बीम राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम आणि एल्बिट सिस्टीमने विकसित केले आहे. ही यंत्रणा ड्रोन, मोर्टार, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट पाडण्यास सक्षम आहे. आजकाल इस्रायलवर सहा ठिकाणांवरून हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलसाठी आयर्न बीम फायदेशीर ठरेल. 


कसे काम करेल आयरन बीम? 


 


इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आयरन बीम कमी पल्ल्याच्या प्रोजेक्टाइलला खाली पाडेल. काही ड्रोन खूप लहान आहेत, त्यांना रडारलाही पकडता येत नाही. त्यामुळे आयर्न डोमही इथे उपयोगी पडत नाही. पण आयर्न बीम लहान असे ड्रोनही खाली पाडेल. सिस्टममधून एक लेझर बीम लक्ष्याच्या दिशेने सोडला जाईल. थोड्याच वेळात ते शत्रूचे ड्रोन आणि रॉकेट आकाशातच नष्ट करेल.


मध्यपूर्वेत वाढता तणाव


 


गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून इस्रायल गाझामध्ये हमाससोबत युद्ध करत आहे. त्याचवेळी उत्तरेकडील सीमेवर हिजबुल्लासोबत युद्धही सुरू आहे. गाझामध्ये आतापर्यंत 42 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. लेबनॉनमध्येही हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि इराणने एकमेकांवर हल्ले केले. तेव्हापासून मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बी-52 बॉम्बर, लढाऊ विमाने तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.


आयरन बीम क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट आणि मोर्टारचा सामना करेल. इस्रायलचा तिन्ही देशांमधील प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाश झाला आहे. त्यामुळे इस्रायलसाठी आयरन बीम खूपच फायदेशीर ठरणार आहे. आयरन बीम आयरन डोममध्ये असलेल्या कमतरता भरून काढेल.