Dinosaur Extinction: कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनोसॉरचे अधिराज्य होतं. डायनोसॉर नंतर  इतका महाकाय आणि शक्तिशाली प्राणी या पृथ्वीतलावर झाला नाही. डायनोसॉर  पृथ्वीवरुन नष्ट का झाले यावर अजूमही शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. संशोधना दरम्यान प्रत्येक वेळेस नव नविन खुलासे होत आहेत. नव नविन कारणे समोर येत आहेत. आता पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे थेट भारताशी कनेक्शन जोडण्यात आले आहे. नव्या संशोधना दरम्यान हा खुलासा झाला आहे. डायनोसॉर नष्ट होण्या भारतातील दख्खनचे पठार कारणीभूत असल्याचा दावा देखील केला जात आहे. 


डायनोसॉर पृथ्वीवरुन कसे नष्ट झाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायनोसॉर नष्ट होणे हे पृथ्वीवरील सर्वात मोठी आपत्ती मानली जाते. उल्कापिंडामुळे डायनोसॉर पृथ्वीवरुन झाले असा दावा या आधी झालेल्या संशोधनावरुन करण्यात आला आहे. लघुग्रहाच्या धडकेत डानोसॉर नष्ट झाले. 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक लघुग्रह धडकला. या लघुग्रहाच्या धडकेनंतर उत्तर अमेरिकेत समुद्रात मोठा त्सुनामी आला. 1600 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. या त्सुनामीत अडकून डायनासोर नष्ट झाले. लुइसियाना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला होता.  लाटांच्या वाळूच्या अवशेषांवरून याबाबतचे संशोधन करण्यात आले होते. हा लघुग्रह मेक्सिकोच्या यूकाटन बेटावर धडकला होता असा दावा संधोकांनी केला. या धडकेनंतर त्सुनामीच्या लाटा जगभर फैलावल्या होत्या. संपूर्ण पृथ्वी त्यावेळी धुळीच्या ढगाने आच्छादीत झाली होती. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात विषारी वायू पसरले. याचा मोठा परिणाम पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या जीव सृष्टीवर झाला. या विनाशात डायनोसॉर नष्ट झाला असा दावा अनेक संशोधनादरम्यान करण्यात आला आहे.


डायनोसॉरच्या विनाशाचे भारताशी कनेक्शन काय?


लघुग्रहांची धडक तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात विषारी वायू तयार झाला. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन आणि सल्फर डायऑक्साइड या वायूंचे प्रमाण वाढले. यामुळे पृथ्वीवरील 75% जीवसृष्टीचा विनाश झाला. ज्वालामुखीच्या लावाच्या प्रवाहामुळे भारतातील दख्खनचे पठार तयार झाले आहे. ज्वालामुखीचा इतिहास आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी संशोधक येथील खडकांचे सातत्याने परीक्षण करतात. येथील सल्फरचे प्रमाण मोजण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले गेले आहे. मॉडेलनुसार, डेक्कन ट्रॅप्समधून सतत होणाऱ्या सल्फर उत्सर्जनामुळे पृथ्वीवरील तापमानात कमालीचे बदल झाले. या ज्वालामुखी क्षेत्रातूनच एक दशलक्ष घन किलोमीटर इतके प्रचंड वितळलेले खडक बाहेर पडले. ज्वालामुखी उद्रेकानंतर हवामानाची परिस्थिती अस्थिर होती. तापमानात कमालीची घट झाली. या वातावरणात डायनासोर नष्ट होण्याची शक्यता असते. दख्खन पठारवरील स्थिती ही अशाच प्रकारची होती असा दावा मॅकगिल विद्यापीठातील भू-रसायनशास्त्रज्ञ डॉन बेकर यांनी केला आहे.