मुंबई : तुम्ही अनेक स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटला असाला. पण एक असा स्विमिंग पूल जो जगातील सर्वात जास्त खोल आहे. ज्यामध्ये अनेक नव्या सुविधा आहे. हा भव्य स्विमिंग पूल दुबईत आहे. दुबईचे प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी 7 जुलै रोजी स्विमिंग पूल सर्वांसाठी खुला केला आहे. 'डिप डाईव्ह दुबई'(Deep Dive Dubai) असं या स्विमिंग पूल नाव आहे. हा स्विमिंग पूल 60.02 मिटर खोल आहे. ज्यामध्ये 14 मिलियन लिटर पाणी साठवण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रेकॉर्ड ब्रेकिंग पूल Nad Al Shebaमध्ये आहे. जो दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. बिन मोहम्मद यांनी सोशल मीडियावर स्विमिंग पूलचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यातील काही निवडक व्हिडिओ...



या स्विमिंग पूलमध्ये एक सुंदर शहर आहे. ज्यामध्ये अपार्टमेन्ट, गॅरेज आणि अन्य  गोष्टी देखील आहेत. 'गिनीज वर्ल्ड'ने देखील स्विमिंग पूलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय हे रोकॉर्ड ब्रेक स्ट्रक्चर आहे . असं देखील सांगितलं आहे. सध्या या पूलचे  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.