अॅमेझॉनच्या जंगलातून जंगलातून निघालेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण जगावर महामारीचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनापेक्षाही खतरनाक असलेल्या या व्हायरसवर  संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगाचा गाडा अडकला आहे. त्यापेक्षाही मोठं संकट जगावर घोंगवत आहे. अॅमेझॉनच्या जंगलात सापडलेला हा व्हायरस आतापर्यंतची सर्वात मोठी महामारी आणण्याची क्षमता ठेवतो.


अशी लागला या खतरनाक व्हायरसचा शोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझिलच्या मानौस येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझॉनच्या बायोलॉजिस्ट मार्सेलो गोर्डो आणि त्यांच्या टीमला कूलरच्या आता तीन पाइड माकडांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. या मृतदेहांना फियोक्रूज अॅमेजोनिया बायोबँक येथे पाठवण्यात आले होते. येथे वैज्ञानिक अलेसांड्राने माकडाच्या सॅम्पल्समधून पॅरासिटिक वॉर्म्स, व्हायरस आणि अन्य संसर्गजन्य घटकांचा शोध लावला आहे. अलेसांड्राने म्हटलं आहे की, मानौस आणि ब्राझिलवर मोठं संकट घोंघावत आहे. 


हा व्हायरस योडा-फेस्ट पाइड टैमेरिन माकडांपासून पसरत आहे. हे माकडं संपूर्ण ब्राझिलमध्ये सापडतात.  हा व्हायरस खूप जास्त रोगराईचा संसर्ग पसरवू शकतो.


आणखी एका व्हायरसची भीती


सायन्स जर्नलच्या मते, अलेसांड्रा आणि त्यांच्या टीमने मायारो व्हायरसचा देखील शोध लावला आहे. हा व्हायरस दक्षिण अमेरिकी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या व्हायरसमुळे डॉक्टर हेच कळण्यात अडचण होते की, हा मायारो व्हायरस आहे की, चिकनगुनिया - डेंगू आहे. कारण हा व्हायरस तुमच्या शरिरातील प्रतिकार क्षमतेला इजा पोहचवू शकतो.