मुंबई : Optical Illusion हे असे फोटो आहेत जे आपल्याला गोंधळात टाकतात. असाच एक फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. युझर्सना हा फोटो चकित करतोय. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात बनवलेल्या स्केचमध्ये एकापेक्षा अधिक महिलांचे चेहरे आहेत, जे शोधणं सोपं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनाला भिडणाऱ्या या फोटोमध्ये केवळ 2 टक्के लोकांनाच चार महिलांचे चेहरे सापडलेत. 98 टक्के लोकं हे आव्हान पूर्ण करण्यात अपयशी ठरलेत. हा फोटो युक्रेनियन कलाकार ओलेग शुप्लियाक यांनी बनवलंय. फोटोमध्ये एकट्या महिलेचं चित्र दिसत नाही, असं नाही, फक्त 3 महिलांनंतर चौथ्या महिलेचा चेहरा शोधण्यास थोडा वेळ लागेल.


फोटोत लपले आहेत 4 महिलांचे चेहरे


हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की, हे एका स्त्रीचं चित्र आहे, जे खूप सुंदर बनवलं आहे. तिचे हवेत केस उडताना दिसतायत. यामध्ये ती ती फोनवर बोलताना दिसतेय. कलाकाराने हे चित्र अशा पद्धतीने बनवलं असलं तरी या चित्रात आणखी तीन महिलांचे चेहरे आहेत.


ओलेगने आपल्या वेबसाइटवर लिहिलं आहे की, ऑप्टिकल इल्युजनमध्ये फोटो प्रतिकात्मक पद्धतीने बनवला जातो. चार महिलांचे चेहरे शोधण्यासाठी लोकांना बराच वेळ लागत आहे. तुम्ही पण एकदा प्रयत्न करून पहा.



कसे शोधाल 4 चेहरे


फोटोतील पहिली महिला प्रत्येकाला दिसतेय, जी फोनवर बोलतेय. तिचे केस हवेत उडतायत. दुसरी स्त्री पाहण्यासाठी, तुम्हाला पहिल्या स्त्रीच्या गालावर आणि हाताकडे लक्ष द्यावं लागेल आणि तुम्हाला तिचा चेहरा दिसू लागेल. 


तिसरी स्त्री शोधण्यासाठी अजून थोडे प्रयत्न करावे लागतील आणि त्या महिलेच्या हाताजवळ तुम्हाला एका लहान महिलेचा चेहरा दिसेल. चौथ्या महिलेचा चेहरा मुख्य महिलेच्या पोटाजवळ कापडाचा बनलेला असतो. तुम्हाला तिचे ओठ आणि बंद पापण्या दिसतील.